आदिवासी सदस्यांना सरकारी योजनांची माहिती देण्यास टाळाटाळग्रामपंचायत सदस्याने केली ग्रामविकास अधिकारी ऐ.जे. थोरात यांच्या मनमानी कारभाराची तक्रार

 


 

शहापूर

 

शहापूर तालुक्यातील धनिक समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणजे वासिंद ग्रामपंचायत या ग्रामपंचयतचे ग्रामविकास अधिकारी ऐ. जे. थोरात हे मनमानी कारभार करत असल्याची तक्रार वासिंद ग्रामपंचायत सदस्य काळूराम पवार यांनी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वासिंद ग्रामपंचायतमध्ये सन २०१४ पासून ऐ. जे. थोरात हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असून हे मासिक सभांमध्ये सर्वानुमते होणारे ठराव यांची नोंद प्रोसिडिंगला घेऊन देखील आंबलबाजावणी करत नाहीत. तसेच त्यांचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने वासिंदच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत जाब विचारल्यास माझी बदली करा अशी अरेरावी ची उत्तरे आम्हा ग्रामपंचायत सदस्यांना नेहमी देत असतात तसेच मी आदिवासी सदस्य असतांना देखील सरकारी योजनांची माहिती देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे या मनमानी करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग आवलंबवा लागेल असा इशारा देखील काळूराम पवार यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जि प ठाणे यांना लेखी निवेदनाद्वारे केला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad