पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात झोपडीधारकांचे ठिय्या आंदोलन

SRA योजनेतील पर्यायी जागेपोटीचे ३५५ झोपडीधारकांचे ११ महिन्याचे  घरभाडे थकीत
झोपडीधारकांनी कोरोना काळात रस्त्यावर उतरून केले ठिय्या आंदोलन 


ठाणे


पालकमंत्र्यांच्या मतदार संघातील SRA योजनेतील विकास प्रस्ताव क्र. S01/0035/13 धोबीघाट कोपरी काॅलनी ठाणे पुर्व येथील SRA योजनेतील ३५५ झोपडीधारकांचे पर्यायी जागेपोटीचे घरभाडे मागील ११ महिन्यापासून मिळाले नसून झोपडीधारकांचे कुंटूंब रस्त्यावर आले आहे  सदर प्रकरणी SRA कार्यालयात सातत्याने तक्रार दाखल करून  देखील प्रशासकिय अधिकारी व लोकप्रतिनिधि दुर्लक्ष करीत असल्याने ऐन कोरोना संकटाच्या काळात पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांकडून  रस्त्यावर उतरून विकासकाचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.


कोरोना ( covid-19) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने २२ मार्चपासून लॅाकडाऊन जाहीर केल्यापासून कामधंदा  बंद झाल्याने झोपडपट्टीत राहणाऱ्या  सर्वसामान्य वर्गावर कुंटूंब सांभाळणे हालाखीचे झाले असून  हा घटक अल्प उत्पन्न मिळवणारा असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती तशी  बेताचीच असते. त्यातच मागील अकरा महिन्यापासून भाडे न मिळाल्याने जीवन जगणे असह्य झाले असल्याची खंत अनेक रहिवाशांनी व्यक्त केली. खुद्द पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडत असून याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल ठाणेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सदर प्रकरण येत्या १० दिवसात मार्गी न लागल्यास SRA ठाणे कार्यालय अधिकारी दालनात मुंडन  आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक झोपडीधारकांनी दिला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad