रिपाइं व कामगार आघाडीच्या वतीने ठाणे शहरात जाहीर निषेध

रिपाइं व कामगार आघाडीच्या वतीने ठाणे शहरात जाहीर निषेध

 

राजगृहावर हल्ला करणार्‍या खर्‍या गुन्हेगारांना जेरबंद करा- नानासाहेब इंदिसे  

 

ठाणे

विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर काल दिनांक 07/07/20 रोजी  संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय.  
सदर घटनेचा रिपाइं व  कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीपभाऊ कांबळे व सचिव गुणवंत नागटीळे व महाराष्ट्र प्रदेश सचिव भास्कर वाघमारे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शहाजीराव दुपारगुडे व ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद मगरे  प्रमोद इंगळे , ठाणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली  ठाण्यातील वागळे इस्टेट विभागातील रामनगर रोड नं.28 येथे सोशल डीस्टंस ठेवून निषेध जाहीर  करण्यात आले  त्यावेळी शहर उपाध्यक्ष चंद्रकांत भंडारे, शाखा अध्यक्ष, अरुण सूर्यवंशी, कार्यकर्ते - सागर वाघमारे, बलभीम सोनकांबळे, शामु शिंदे,करण घाडगे, साहिल लोंढे, संतोष आदी पदाधिकारी उपस्थित होते .आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास पुन्हा ठाणे शहरात तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.


राजगृहावर हल्ला करणार्‍या खर्‍या गुन्हेगारांना जेरबंद करा- नानासाहेब इंदिसे  


राजगृहावरील हल्ला हा तमाम आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेवरील हल्ला आहे. आंबेडकरी चळवळीने अनेक चढउतार पाहिले आहेत. पण, बाबासाहेबांनी उभारलेल्या वास्तूवर हल्ला करण्याची हिमंत कोणीही दाखविली नव्हती.  आताच ही हिमंत कशी झाली? असा सवाल करुन या हल्ल्यातील खर्‍या गुन्हेगारांना अन् त्यामागील सुत्रधारांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांनी केली आहे. या हल्ल्याचा रिपाइं एकतावादीने तीव्र शब्दात निषेध केला आहे.  या हल्ल्यामागे असलेले सूत्रधार कोण आहेत अन् हल्लेखोरांनी कोणाच्या सांगण्यावरुन हा हल्ला केला आहे, याचा शोध गृहखात्याने तत्काळ घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजगृहावरील हल्लेखोरांची गय केली जाणार नाही, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचे आंबेडकरी समाजाच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत. मात्र, त्यांनी तत्काळ कार्यवाही करुन  गुन्हेगारांना गजाआड टाकावे, अशी मागणी नानासाहेब इंदिसे यांनी केली आहे.


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1