लॉकडाऊन वाढवू नका नाहीतर लोक उपासमारीने मरतील
 लॉकडाऊन वाढवू नका नाहीतर लोक उपासमारीने मरतील 

 


 

मुंबई

 

लॉकडाऊन उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक भूमिका मांडली आहे. मुलाखतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लॉकडाउन न वाढवण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना मृत्यूदर आज दोन टक्के किंवा त्याच्या थोडा वर असताना दिसत आहे. बुद्धांनी एक गोष्ट सांगितली आहे, की माणसं जन्माला आली, की त्यांचं मरण निश्चित. त्यामुळे आता आपल्याला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था आपण आता सुधारण्याच्या पाठीमागे लागावं. तरच माणसं जगतील, नाहीतर उपासमारीनं माणसं मरतील, अशी परिस्थिती आहे. वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे, लॉकडाऊन आपण वाढवू नका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

 

कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत लॉकडाऊन संदर्भात राज्य सरकारची भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे, यांना विनंती… खुदा होऊ नका. कोरोना व्हायरसने भीती सगळ्यांना घातली. मी सुद्धा त्यावेळी घाबरलो होतो. 40 टक्के लोक बाधित होतील, असं अमेरिकेच्या हॉपकिन युनिव्हर्सिटीनं म्हटलं होतं. पण त्याच्याच आठवड्याभरानंतर ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी सांगितलं की भारतात कोरोना व्हायरस पसरु शकणार नाही. त्यांची रोगप्रतिकार शक्ती फार चांगली आहे. ऑस्ट्रेलिया जिंकत आहे, असं दिसतंय, असं मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलतांना मांडलं.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad