राजगृहावरील हल्ला: ठाण्यात वं.ब.आ.ची निदर्शने 

राजगृहावरील हल्ला: ठाण्यात वं.ब.आ.ची निदर्शने 


 ठाणे


राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.  राजगृह या निवासस्थानी माथेफिरुंनी हल्ला केला आहे. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तसेच, जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊ खर्‍या सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी करण्यात आली. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात.असे असतानाही जर हल्ला होत असेल तर त्यामागे मोठा कट असण्याची शक्यता आहे. पकडण्यात आलेला इसम हा खरोखरच माथेफिरु आहे की सराईत गुन्हेगार आहे, हे सरकारने जाहीर केले पाहिजे. कारण, बाबासाहेबांच्या घरावर हल्ला करण्यासाठी आलेला हा इसम एक प्यादा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहखात्याने सखोल चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी यावेळी मागणी करण्यात आली. ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली किसन पाईकराव, राजू चौरे, अमोल गौलेर, हरीष यादव, अमोल पाईकराव, संदीप शेळके, गोपाळ विश्वकर्मा , अमर आठवले, जितेंद्र आडबले आदी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1