सेवाज्येष्ठतेच्या अनियमिततेबाबत महाराष्ट्र म्यु.क.युनियनची पुन्हा प्रशासनाला धडक

सेवाज्येष्ठतेच्या अनियमिततेबाबत महाराष्ट्र म्यु.क.युनियनची पुन्हा प्रशासनाला धडकठाणे


ठाणे महानगर पालिका सेवेतील प्रशासनाच्या अनियमिता नियमबाह्य नियुक्त्या पदोन्नती. एस.सी., एस.टी., ओ.बी.सी., अनुसूचित जातींवर वर्षानुवर्षे अन्याय होत आहे. बिन्दूनामावली रोस्टर सेवाजेष्ठतेबाबात ह्या सर्व अनियमितता कारभाराबाबत महापालिकेवर ३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आणि अभियंता असोसिएशन यांच्या वतीने उपोषण आंदोलन करण्यात आले होते. यामुळे ठामपामधील कारभार चव्हाट्यावर आला होता. नाना पाटोळे यांच्या माध्यमातून याबाबत चौकशी  नगरविकास खात्याच्या सचिव निकिता पान्डे यांच्याकडून सूरू आहे. 


मात्र दरम्यानच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झाल्याने हे काम प्रलंबित राहिले आहे. याबाबत आता पुन्हा चौकशी व्हावी यासाठी  विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांच्या निवासस्थानी पुन्हा भेट घेण्यात आली. युनियनचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, सेक्रेटरी प्रमोद इंगळे, पाटील, सुनिल जाधव, प्रा.चंद्रभान आझाद, भास्कर वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी २२ जुलै रोजी याबाबत पाटोळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटोळे यांनी महापालिका आयुक्तांशी थेट दुरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत चौकशीचा रिपोर्ट मागवला आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी पाटोळी यांनी युनियनला दिले असल्याची माहिती सचिव प्रमोद इंगळे यांनी ''प्रजासत्ताक जनता''ला दिली 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA