नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या उपकरणांच्या खरेदीची चौकशी करा- विक्रांत चव्हाण


अँटीटेस्ट प्रक्रियेकरीता खरेदी करण्यात आलेल्या उपकरणाची खरेदी नियमबाह्य पद्धतीने 

- ठाणे शहर ( जिल्हा ) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा आरोप 

 प्रकरणाची सखोल चौकशीची करण्याची मागणी, पालिका आयुक्तांना पत्र लिहून प्रश्न केले उपस्थित 

 


 

ठाणे

ठाणे महानगरपालिकेने अँटीजिन्स टेस्टसाठी तब्बल एक लाखाची उपकरणे प्रत्येकी साडेपाचशे रुपये अदा करून विकत घेतली आहेत.  ही उपकरणे खरेदी करताना कोणत्याही लोकप्रतिनिधींना अथवा राजकीय पक्षांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. ही उपकरणे नियमबाह्य पद्धतीने खरेदी  करण्यात आल्याचा आरोप ठाणे शहर ( जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. त्यांनी आज २५ जुलै रोजी आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.  

ठाणे शहर(जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रात याबाबत प्रश्न उपस्थित करून पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.

एवढी उपकरणे खरेदी करताना एवढ्या उपकरणांची गरज असल्यास त्या बाबतचा अहवाल संबंधितांकडून घेण्यात आला होता का?  तसेच असल्याचा कोणाचा अहवाल  घेण्यात आला होता? ही उपकरणे विकत घेताना या उपकरणांचा बाजारभाव व व उपकरणे खरेदीचे इतर पर्याय तपासणे होते का?  ही उपकरणे खरेदी करताना लोकप्रतिनिधींना याची कल्पना देण्यात आली होती का?  तसेच स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली होती का? उपकरणे विकत घेताना निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती का? आदी प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत.   

तसेच कोव्हिड हॉस्पिटल सेंटर करिता हॅण्डग्लोज विकत घेण्यात आलेले आहेत. मात्र विकत घेण्यापूर्वी सादरीकरण करण्यात आलेले व प्रत्यक्ष खरेदी करण्यात आलेल्या हॅण्डग्लोजच्या दर्जामध्ये मोठी तफावत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. 

उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून तसेच काही खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांच्या उपचाराकरिता करण्यात आलेले अवाजवी दर या संदर्भात मुख्य लेखा परीक्षक ठाणे महानगरपालिका यांनी काढलेला निष्कर्ष या सर्व बाबी नीट तपासून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच वेळ पडल्यास या चौकशी करता लोकप्रतिनिधींची तीन सदस्य समिती नियुक्त करावी व पंधरा दिवसात या समितीचा अहवाल मागून सर्व प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA