मानखुर्दपरिसरात गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

वंचितकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 


मुंबई


 राज्यात लॉकडाऊन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काम बंद झाले, खायला अन्नधान्य नाही, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली, अशा बिकट परिस्थिती मध्ये मुलांच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. त्यासाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य आणायचे कुठून हा प्रश्न पालकांना पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची गरज पाहता वंचित बहुजन आघाडी अनुशक्तीनगरच्यावतीने  शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. चेंबूर, मानखुर्द, पांजरापोळ या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले.  वंचित बहुजन आघाडीच्या अनुशक्तीनगर तालुक्याच्यावतीने अनिल वाकोडे, सुरेश वाघमारे, ज्योती यादव, सुनीता डोळस, कविता साळवे, मीना जाधव व अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. मानखुर्द, महाराष्ट्र नगर, पांजरापोळ, वाशी नाका, भारत नगर, मुकुंद नगर या परिसरातील  विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. येत्या काही दिवसात गरजेनुसार स्कूल बॅग, पेन - पेन्सिल व इतर शैक्षणिक साहित्य देणार असल्याचे अनिल वाकोडे, ज्योती यादव, सुनिता डोळस यांनी सांगितले.


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA