उरण-पनवेल मार्गावरील ब्रीज दास्तान फाटापुढे बांधण्यासाठी आंदोलनाचा इशारा

जासईचा ओवरब्रीज दास्तान फाटापुढे बांधण्यासाठी अजित म्हात्रें यांचा धरणे आंदोलनाचा इशारा.ओवरब्रीज मुळे चिर्ले व बेलपाडासह दहा गावातील ग्रामस्थांना भविष्यात होणार त्रास.उरण


उरण पनवेल या मार्गावर जासई कडून उरणकडे जाताना ओवर ब्रीज बांधण्यात येत आहे मात्र हा ओवर ब्रीज दास्तान फाटा येथे स्टॉप न करता पुढे नेण्यात यावा या मागणीसाठी उरण मधील सामाजिक युवा कार्यकर्ते तथा काँग्रेस प्रणित  पर्यावरण व संरक्षण उरण पनवेल तालुका विभागाचे अध्यक्ष अजित म्हात्रे यांनी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, व्यवस्थापक  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण येथे पत्रव्यवहार केला आहे. मागणी 15 दिवसात मान्य न झाल्यास तीव्र धरणे आंदोलनाचा इशारा अजित म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे.


सध्या उरण मध्ये सर्वत्र महामार्गाचे तसेच पुल बांधण्याचे काम जोरात सुरु आहे. उरण पनवेल मुख्य महामार्गावर पनवेल कडून उरणकडे जाताना ओवर ब्रीज बांधण्यात येत आहे.मात्र हे ओवर ब्रीज दास्तान फाटा जवळ जासई येथे संपनार असल्याने बेलपाडा गावातील ग्रामस्थांना सुमारे 1ते 2 किमी चा अधिकचा रस्ता पार करून स्वतःच्या गावात जावावे लागणार आहे. तसेच तेथे बांधण्यात येणार फूट ब्रीज हा 8 ते 9 मीटर उंचीचा असणार आहे. त्यामुळे अश्या फूट ब्रीज वरुन गावातील वयोवृद्ध व आजारी तसेच विकलांग नागरिकांना जाण्या-येण्या करिता भयानक त्रास होणार आहे.


त्यामुळे जासई गावा कडून येणारा फ्लाई ओवर ब्रीज दास्तान फाटा जासई येथे न संपविता तो पुढे उरण बाजूस दास्तान पार करून पुढे संपवावा ज्या योगे चिर्ले गाव ,बेलपाडा गाव आणि परिसरातील इतर दहा गावातील ग्रामस्थ नागरिकांना प्रवासाला अधिक वेळ लागणार नाही. श्रम,वेळ व इंधनची बचत होईल.8 ते 9 मीटर इतका फूट ब्रीज चढने अगर उतरण्याचा त्रास कमी होईल. ही समस्या सामाजिक कार्यकर्ते तथा युवा काँग्रेस कार्यकर्ते व पर्यावरण विभाग अध्यक्ष अजित म्हात्रे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असून या संदर्भात त्वरित उपाययोजना न झाल्यास किंवा मागणी मान्य न केल्यास तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा अजित म्हात्रे यांनी दिला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA