करामध्ये 10 टक्के सूट योजनेचा ठाणेकरांनी लाभ घ्यावा- महापौर

मालमत्ता कर भरणेसाठी महापालिकेची विशेष योजना


संपूर्ण मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सवलतठाणे


ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर एकत्र भरतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या करामध्ये 10 टक्के सूट देण्यात येणार असून या योजनेचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी केले आहे.  सध्या सुरू असलेल्या कोविड 19 चा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने लॉकडाऊन यामुळे बिले प्रत्यक्ष वितरित करण्यामध्ये विलंब होण्याची शक्यता विचारात घेता करदात्यांनी महापालिकेच्या ई सुविधेद्वारे मालमत्ता कर भरावा असे आवाहन करण्यात आले असून  महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ई सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


            ठाणे महापालिका क्षेत्रातील जे करदाते सन 2020-21 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर अशी संपूर्ण रक्कम भरतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये (अग्निशमन कर वगळता) सूट देण्यात येणार आहे. सन 2020-21 या संपूर्ण मालमत्ता कर 15 सप्टेंबरपर्यत भरल्यास 10 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत भरल्यास 4 टक्के, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भरल्यास 3 टक्के तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत भरल्यास 2 टक्के सूट देण्यात येणार आहे.  तरी नागरिकांनी या सवलतीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन सन 2020-21 या आर्थीक वर्षाचा मालमत्ता कर प्राधान्याने भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad