वंचित युवकांना त्यांचं स्वत्व सापडण्याचा क्षण ही संस्था देते- निरजा

ठाणे


 वंचित युवकांना त्यांचं स्वत्व सापडण्याचा क्षण ही संस्था देते. त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जडणघडण करण्याचा प्रयत्न सतत २८ वर्षे करणे, हे अतिशय कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार  जेष्ठ कवियत्री, लेखिका निरजा यांनी संस्थेचे अभिनंदन करतांना व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्थेच्या २८ व्या वर्धापन दिनानिमित्ता आयोजित केलेल्या झूम मेळाव्यात त्या बोलत होत्या. कोरोना काळात सतत संस्थेच्या वतीने मदत कार्यात अग्रेसर असणारा कोरोना योद्धा आणि संस्थेचा युवा कार्यकर्ता अजय भोसले यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते. संस्थेच्या जेष्ठ सहकारी आणि संस्थापक लतिका सु. मो. अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून मेधा पाटकर होत्या


” वंचितांचा रंगमंचचे प्रणेते दिवंगत जेष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी आणि त्यांच्या कन्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि साहित्यिक सुप्रिया विनोद यांनी संस्थेला शुभेच्छा देऊन संगितले की, रत्नाकर मतकरी यांकडे वंचितांचा रंगमंच अर्थात नाट्य जल्लोषचे कार्य पुढे नेण्यासाठी त्या सर्वतोप्रकारे मदत करतील.


सर्वांचे स्वागत करून प्रस्तावना करताना संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे नव निर्वाचित अध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय मंगला गोपाळ यांनी संस्थेच्या स्थापनेचे उद्दीष्ट तसेच संस्थेची आजपर्यंतची वाटचाल याबद्दल माहिती दिली. 


” संस्थेच्या संस्थापक  निशा शिरूरकर यांनी संस्था स्थापन करतानाच्या वेळेचे वातावरण, त्यामागचा विचार आणि त्यासाठी केलेले प्रयत्न यांची माहिती दिली. संस्थेचे विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी, लॉकडाऊनच्या काळात श्रमिकांच्या आणि युवकांच्या  रोजगाराचे, डिजिटल शिक्षणाच्या नावाने येत असलेल्या शैक्षणिक विषमतेचे, महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचे अनेक प्रश्न नव्याने, नवीन स्वरुपात पुढे येत आहेत हे नमूद केले आणि समता संस्थेने जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाशी जोडून घेत, हे विषय कोरोंनाच्या काळातही निर्भयपणे हाती घेतले पाहिजेत,असे आवर्जून संगितले.


संस्थेच्या अध्यक्ष मनीषा जोशी यांच्या श्रीवर्धन येथील घराचे आणि एकंदरीत त्या गावाचे आणि परिसराचे ‘निसर्ग’ वादळाने किती भयंकर नुकसान केले त्या विध्वंसाच्या स्वतः पाहिलेल्या स्वरूपाचे वर्णन त्यांनी केले. संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यांनी वंचितांचा रंगमंच म्हणजेच नाट्यजल्लोष याच्या पुढील कार्यक्रमांबद्दल माहिती दिली. संथेच्या कार्यवाह हर्षलता कदम यांनी संस्थेच्या वर्षभरात झालेल्या उपक्रमांची, कार्यक्रमांची माहिती दिली.  


संस्थेच्या उपाध्यक्ष आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लतिका सु. मो यांनी समारोप करतांना, एकलव्य सक्षमीकरण योजना आणि नाट्यजल्लोष हे उपक्रम चालवताना आलेले अनुभव कथन केले. शैलेश मोहिले, राजेंद्र बहाळकर आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. संजय निवंगुणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. 


या वेळी प्रा. विनय र.र., प्रा. शिवाजी गायकवाड, दादासाहेब रोंगे, हेमंत जगताप, ऍड. अरविंद तापोळे,  शुभांगी आणावकर, अजित पाटील, सुप्रिया कर्णिक, जयंत कुलकर्णी, सिरत सातपुते, उत्तम फलके, उषा मेहता, जीवराज सावंत, वासंती दामले, मंगल व सुरेंद्र दिघे, निलेश मयेकर, दर. प्रेरणा राणे आदी मान्यवर उपस्थित होते. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून प्रक्षेपित केलेल्या या कार्यक्रमात सुमारे ७०० लोकांनी सहभाग नोंदवल्याची माहिती  कार्यक्रमाच्या डिजिटल बाबी सांभाळणाऱ्या प्रकेत ठाकुरने सांगितले. 


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या