दलितांवरील अन्याय अत्याचार प्रकरणी सर्व आंबेडकरी नेत्यांनी- कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचे आवाहन
पुणे
विराज जगताप या तरुणाच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, दलितांच्या न्याय हक्क व संरक्षणा साठी आम्ही कटिबद्ध आहोत असे बोलून विराजच्या कुटूंबियांना न्याय देण्यासाठी उशीर लावल्यास आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांनी दिला. विराज जगताप यांच्या पीडित कुटुंबियांचे घरी सांत्वन करण्यासाठी गेले असता निकाळजे बोलत होते यावेळी रिपाइं प्रदेश अध्यक्ष अमित मेश्राम, डीबीएन संघटना प्रदेश उपाध्यक्ष , माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, रिपाइं प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, रिपाइं पुणे जिल्हा अध्यक्ष अमित वर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
विराज जगताप हत्ये प्रकरणी आंबेडकरी चळवळीतील सर्वच पक्ष संघटना आपापल्या पद्धतीने संघर्ष करीतच आहेत परंतु दलितांवर असे अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात त्या प्रत्यक वेळी चळवळीतील नेते कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे त्यासाठी सर्व एकत्र येऊन लढा देऊ असेही दिपक निकाळजे यांनी जाहीर केले. पुन्हा दलितांवर असे अत्याचार होणार नाही म्हणून विराज चा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही गप्प बसणार नाही ,राज्यातील कार्यकर्त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेले निर्देश व कायदा सुव्यवस्था पाळून शासन प्रशासनाला आपल्या भावना पोहचवण्याचे आवाहनही करून राज्यातील सर्व दलित अन्याय अत्याचार व हत्याकांड प्रकरणाबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत अशीही माहिती माध्यमांशी बोलतांना निकाळजे यांनी दिली
0 टिप्पण्या