Trending

6/recent/ticker-posts

हिन्दुस्थान पेट्रोलियम संलग्न संस्थेचे मोफत अन्नधान्य वाटप

हिन्दुस्थान पेट्रोलियम संलग्न संस्थेचे कामाठिपुऱ्यातील गरजूंना मोफत अन्नधान्य वाटप


मुंबई


एचपी सेवा संस्था आणि ऑल इंडिया हिन्दुस्थान पेट्रोलियम एससी/ एसटी एम्प्लॉईझ वेल्फेअर असोशिएशन, मुंबई यांनी सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई यांच्या माध्यमातून कामाठिपुरा विभागातील देहविक्रय करणाऱ्या १०० गरजू महिलांना मोफत अन्नधान्याचे वाटप केले. या भोजनदान चळवळीत ६४ व्या दिवशी एचपी सेवा संस्था आणि ऑल इंडिया हिन्दुस्थान पेट्रोलियम एससी/ एसटी एम्प्लॉईझ वेल्फेअर असोशिएशन, मुंबई यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी १०० महिलांना अन्नधान्याचे वाटप केले. यामध्ये तेल, डाळ, पीठ, तांदूळ, हळद, मीठ, मिरची पावडर, साबण आदी दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. एचआयव्ही संक्रमित असलेली व्यक्ती जर ऍण्टी रेट्रो व्हायरल थेरपी औषधोपचार घेत असेल तर तिला पोषक आहाराची नितांत आवश्यकता असते. या कारणामुळे सुद्धा एचपी सेवाने हे अन्नधान्याचे वाटप केले. एचपीसेवेचे अध्यक्ष वैभव गवळी, जनरल सेक्रेटरी शरद ननावरे, कार्यकारी अध्यक्ष तानाजी अदाते, सिध्दार्थ घोलप आदींनी मोलाचे सहकार्य केले.


सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन अर्थात साई ही संस्था देहविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन आणि उत्कर्षासाठी गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत आहे. टाळेबंदीच्या काळात उत्पनाचे स्त्रोत बंद झाले. रेशनकार्ड नसल्याने शासकीय अन्नधान्य मिळत नव्हते. परिणामी उपासमारीला सामोरे जावे लागत असे. या महिलांची ही व्यथा पाहून साई संस्थेने भोजनदान सुरु केले. समाजातील विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांना आवाहन करण्यात आले. साईच्या आवाहनास सर्वच स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेकांनी अन्नधान्याच्या रुपाने साईच्या माध्यमातून या महिलांची उपासमारी होऊ दिली नाही.


“आमच्या या दिदींकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना शासकीय अन्नधान्याचा लाभ मिळत नाही. परिणामी त्यांची उपासमार होऊ लागली. साईने समाजातील सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींना आवाहन केले. त्यातून भोजनदानाची चळचळ उभी राहिली. या चळवळीच्या ६५ व्या दिवशी एचपी सेवा संस्था आणि ऑल इंडिया हिन्दुस्थान पेट्रोलियम एससी/ एसटी एम्प्लॉईझ  वेल्फेअर असोशिएशन, मुंबई यांनी जे अन्नधान्याचे वाटप केले त्यासाठी साई संस्था दिदींच्या वतीने आभारी आहे”, अशी कृतज्ञता साई संस्थेचे संचालक विनय वस्त यांनी व्यक्त केली.


 


 


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या