अतिरिक्त विज बिल माफीसाठी वं.ब. महिला आघाडीचे निवेदन

अतिरिक्त विज बिल माफीसाठी वं.ब. महिला आघाडीचे निवेदनकल्याण,
वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे विद्युत महामंडळाला अतिरिक्त  विज बिलमाफी साठी निवेदन देण्यात आले.
कोरोना सारख्या महामारी मुळे उदभवल्या लाॅकडाउन च्या परिस्थिती मध्ये आलेले अतिरिक्त विजबिल माफ करण्या बाबत वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा च्या वतीने कल्याण येथील विद्युत  महामंडळला पक्षाच्या वतीने दिनांक २६ जुन‌ २०२० रोजी निवेदन देण्यात आले . यावेळी प्रामुख्याने वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे, उपाध्यक्ष अॅड.रजनी आगळे, रेखा कुरवारे,सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष इंजि.रूपेश हुंबरे, जिल्हा संघटक उत्तम गवळी, नितीन वानखेडे ,सुरेन्द्र ठोके, निलेश कांबळे,विश्वविकास गायकवाड,प्रविण पाठारे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


    लाॅकडाउन च्या नाजुक काळामध्ये सर्व सामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली आहे, लोकांचे रोजगार बुडाले आहे. उदरनिर्वाह कसा चालवायचा हा भयानक प्रश्न जनतेसमोर पडला.अशातच विद्युत महामंडळानी सरसकट वारेमाप बिल पाठवले आहे.त्यामुळे सर्व सामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.ह्या शासनाच्या कृत्याचा वंचित बहुजन आघाडी निषेध करते.          कोरोना महामारीमुळे शासनाने घोषित केलेल्या लॉकडाउन काळातील विज बिल माफ़ करून सर्वसामान्य जनता,मजूर,शेतकरी,वंचित समुहाला दिलासा द्यावा. ही प्रमुख मागणी  करण्यात आली.अन्यथा वंचित बहुजन आघाडी आक्रमक आंदोलन करण्यात येईल हा इशारा देण्यात आला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या