Trending

6/recent/ticker-posts

राज्य शासनाकडून ठाणे जिल्ह्याला ६८ कोटींचा अतिरिक्त निधी


राज्य शासनाकडून करोनाच्या मुकाबल्यासाठी ठाणे जिल्ह्याला ६८ कोटींचा अतिरिक्त निधी


ठाणे - 


करोना साथीच्या मुकाबल्यासाठी  ठाणे जिल्ह्याला राज्य सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नगरविकास विभागानेही करोनाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी ३३ कोटींचा निधी वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजनेद्वारे मंजूर केला आहे. अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यासाठी ६८ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने हा निधी उपलब्ध करण्यात आला.


महसूल विभागाच्या माध्यमातून ठाणे ५ कोटीकल्याण-डोंबिवली महापालिका १० कोटीनवी मुंबई महापालिका १० कोटी आणि मीरा-भाईंदर महापालिका १० कोटीअसे ३५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेततर नगरविकास विभागामार्फत ठाणे ४.९६ कोटीउल्हासनगर ७ कोटीकल्याण-डोंबिवली ७ कोटीअंबरनाथ ७ कोटी आणि भिवंडी ७ कोटीअसे ३२.९६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. महसूल विभागाकडून संपूर्ण कोकण विभागासाठी १०९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून औरंगाबाद विभागासाठी २० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. 


ठाण्यासह संपूर्ण एमएमआर परिसरात करोना साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून आरोग्यव्यवस्था बळकट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीअंबरनाथउल्हासनगर या महापालिका/नगरपालिकांना पुरेसे आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता होती.  त्यानुसार महसूल विभागामार्फत वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली. तसेच, नगरविकास खात्याच्या मार्फतही निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे करोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळेल


   


 


 ReplyForwardPost a Comment

0 Comments