पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देणार- नवनिर्वाचित आयुक्त डॉ.शर्मा

प्रत्येक गरजू रूग्णाला बेड मिळायलाच हवा: कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी टीम म्हणून काम करू


नुतन महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी अधिका-यांमध्ये जागविला विश्वासठाणे


सद्यस्थितीत कोवीडचा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सुविधा निर्माण करण्यावर आपला भर असल्याचे सांगून प्रत्येकाचा जीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य असून त्यासाठी टीम म्हणून काम करूया नवनिर्वाचित आयुक्त बिपीन शर्मा यांनी स्पष्ट केले.  ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विपीन शर्मा यांनी आज २४ जुन रोजी सर्व अधिकारी, उप आयुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेवून कोरोना कोवीड १९ विषयी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले.


यावेळी त्यांनी उप आयुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्रभाग समिती स्तरावर कशा पद्धतीने काम चालते, कोणत्या अडचणी जाणवतात याची माहिती घेतली. याबैठकीला विशेष अधिकारी, कोवीड १९ रंजीत कुमार, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख आणि महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.


आपण जे चांगले काम करीत आहोत ते सुरूच ठेवणार असून ज्या ठिकाणी जास्त काम करण्याची गरज आहे त्यावर प्रभावीपणे काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्या कोवीड १९ रूग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना बेड उपलब्ध करून देण्यापेक्षा ज्या रूग्णांना बेडची खरी गरज आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीत बेड मिळायलाच हवा. त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे त्या प्राधान्याने निर्माण करू असे सांगितले.  ज्या सुविधा निर्माण करण्याची गरज असेल त्या करू असे स्पष्ट करून आपल्याला कोरोनासोबतच राहायचे आहे पण त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वांनी टीम म्हणून काम करू असा विश्वास शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिला.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या