शेअर बाजारात वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३२९.१७ अंकांची बढत

शेअर बाजारात वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३२९.१७ अंकांची बढतमुंबई,


२७ जून २०२०: सलग दोन दिवस लाल रंगात व्यापार केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी सकारात्मक स्थिती दर्शवली. निफ्टी ०.१९% किंवा ९४.१० अकांनी वाढून १०,३८३.०० अंकांवर बंद झाला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सनेही आज ०.९४% किंवा ३२९.१७ अंकांची वृद्धी घेत ३५,१७१.२७ वर व्यापार बंद केला.


एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापार सत्रात १६२९ शेअर्सनी नफा कमावला. तर १४१ शेअर्स स्थिर राहिले. १०४० शेअर्सचे मूल्य घसरले. बीपीसीएल (६.५०%), इन्फोसिस (६.६४%), टीसीएस (४.९२%), आयओसी (४.७६%) आणि इंडसइंड बँक (३.७६%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती इन्फ्राटेल (२.८२%), बजाज फायनान्स (३.०९%), आयटीसी (३.०७%), टाटा मोटर्स (१.७३%) आणि कोटक महिंद्रा बँक (२.३५%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.


एफएमसीजी आणि फार्मा सेक्टर्सनी आज घसरण अनुभवली तर इतर सेक्टर्सनी हिरवा रंग दर्शवला. बीएसई मिडकॅप ०.२७% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅप ०.१९% नी वाढले. भारतीय रुपयाच्या मूल्यात आज थोडा बदल झाला तरीही त्याने आजच्या व्यापारी सत्रात वाढीचे सत्र कायम ठेवले. भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७५.६४ रुपयांचे मूल्य गाठले. कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सोन्याच्या दरांनीही सलग तिसऱ्या दिवशी वाढ दर्शवली. सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसून आला तरी स्पॉट गोल्डचे दर १७६० अमेरिकी डॉलरवर स्थिर होते. जगातील विविध भागात कोव्हिड-१९च्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊनही जागतिक बाजाराने वृद्धी दर्शवली. नॅसडॅकने १.०९% ची, एफटीएसई १०० ने १.७२%, एफटीएसई एमआयबीने १.५२%, निक्केई २२५ ने १.१३%ची वाढ दर्शवली. तर हँग सेंगने आज ०.९३% ची घसरण अनुभवली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA