प्रथम ग्लोबल हब येथील रुग्णालयातील संपूर्ण १००० बेड पूर्णपणे कार्यान्वित करा
त्यानंतरच नवीन कोव्हीड रुग्णालय बाबतचे नियोजन करा- संजय घाडिगावकर
ठाणे
प्रथम ग्लोबल हब येथील कोव्हीड रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, आरोग्यव्यवस्था किमान आवश्यक संख्या तरी करून तेथील अतिदक्षता विभाग तातडीने चालु करा. रुग्णालयातील संपूर्ण १००० बेड पूर्णपणे कार्यान्वित करा, त्यानंतरच नवीन कोव्हीड रुग्णालय बाबतचे नियोजन करा असे जाहीर निवेदन ठाण्यातील समाजसेवक संजय घाडिगावकर यांनी केले आहे. सोशिल मिडीयाच्या सहाय्याने त्यांनी पालकमंत्री आणि ठाणे महापालिका प्रशासनाला आवाहन केले आहे की, प्राथमिक गरजांना प्राधान्य द्या. याकरिता महापालिकेच्या वास्तु ,कोपरी, कळवा ,तरण तलाव ,रहेजा तरण तलाव ,रिसोर्ट , दादोजी कोंडदेव व शरद पवार स्टेडियम कोव्हीड उपाययोजना करिता ताब्यात घ्या. डॉक्टर व नर्स यांची कमतरता भरून काढा, राज्य शासनाकडे तशी मागणी करा. तसेच महापालिकेच्या जागेवरिल आपले परम मित्रांचे हाजूरी येथील हॉस्पिटल कोव्हीडसाठी घ्या असा सूचक सल्लाही घाडीगावकर यांनी दिला आहे.
आपल्या निवेदनात त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध आजही होत नाहीत, TMT बसेसचे रुग्णवाहिका त रूपांतर करून त्या अरुंद गल्लीत पोहचत नाहीत, नुसत्या tmc समोर उभ्या करून उपयोग नाही. असे म्हटले आहे. याकरिता ठाण्यात असलेल्या सर्व खाजगी रुग्नवाहिका ताब्यात घ्याव्यात. तसेच TMC war room चे landline टेलीफोन तातडीने सुरु करण्यात यावेत. याशिवाय महापालिकेने चालु केलेले, विविध वास्तु मधील चालू असलेले विलगीकरन कक्षात स्वछता ,आरोग्यव्यवस्था डॉक्टर नर्स व्यवस्था ,जेवण यामध्ये सुधारणा करण्यात यावी. रिपोर्ट शिवाय कोरोना रुग्णांना दाखल करता येत नाही, याकरिता सर्व आरोग्य केंद्रावर २४ तास दिवस-रात्र करिता डॉक्टर नर्स व इतर कर्मचारी उपलब्ध करावेत. जेणेकरून कोव्हीड टेस्ट केलेले रुग्ण रिपोर्ट आल्यावर रुग्णालयात दाखल करताना जो वेळ लागतो तो वेळ कमी लागेल. अशा सूचना केल्या आहेत.
विलगीकरन कक्षात / केंद्रात high risk वरील नातेवाईक यांची सकाळ संध्याकाळ आरोग्य तपासणी करून त्या रिपोर्टवर सबंधित व्यक्तिची सही घेण्यात यावी. कोव्हीड रुग्णालयात दाखल असलेले अतिदक्षता विभागातील रुग्ण यांची आरोग्य विषयी प्रोग्रेस रिपोर्ट व देण्यात येणारे उपचारा बाबत त्यांच्या नातेवाईकाना रोज सकाळ संध्याकाळ सांगणे वा मोबाईल वर पाठवणे बाबतचे आदेश सबंधित सर्व रुग्णालयाना / विलगीकरन कक्षाना देण्यात यावे. रुग्णाचे देयक रोज च्या रोज रुग्णाच्या नातेबाईक यांना in detail item vise दरा सह आणि quantity सह देण्यात यावे. याशिवाय डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या (जीवन सुरक्षा कवचासह )मानधन /पगाराची व आरोग्य यंत्रणा / व्यवस्था राबवायला लागणाऱ्या सर्व साहित्य,मशीनरी,मेडिसिन,यांची कमाल व्यवस्था खर्चासह नियोजन ठेवावे. असे जाहीर निवेदन घाडीगावकर यांनी पालकमंत्री आणि पालिका आयुक्तांना दिले आहे.
निवेदन...... - JANATA xPRESS - https://prajasattakjanata.page/article/nivedan-/Y03_k2.html
0 टिप्पण्या