बहुजन संग्रामचे कोरोना मदत कार्य १५ ऑगस्टपर्यंत चालणार : चिलगावकर

बहुजन संग्रामचे कोरोना मदत कार्य १५ ऑगस्टपर्यंत चालणार : चिलगावकरमुंबई,


लॉक डाऊन जून महिना संपल्यानंतरही उठणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले आहे. तर, रेल्वे १२ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, गरिबांना शिधा आणि किराणा वस्तूंच्या वाटपाचे सुरू असलेले बहुजन संग्रामचे मदत कार्य १५ ऑगस्टपर्यंत सुरूच राहील, अशी घोषणा त्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी केली आहे.


पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील घोडमाळ या गावामधील आदिवासी पाड्यांतील १२०० कुटुंबाना प्रत्येकी १२ किलो शिधा आणि किराणा वस्तूंचे वाटप शनिवारी करण्यात आले. त्याची माहिती देताना हे मदत कार्य स्वातंत्र्य दिनापर्यंत सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. शनिवारी घोडमाळ गावात आदिवासींना भीमराव चिलगावकर यांच्या हस्ते मदत वाटप करतेवेळी गर्दी टाळण्यासाठी विनोद कांबळे,विष्णू वाघ, तेजस वाघ असे मोजकेच पदाधिकारी सोबत होते.


बहुजन संग्रामने १४ एप्रिलच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला या मदत कार्याचा प्रारंभ केला होता. शनिवारी त्याचा पाचवा टप्पा पार पडला. त्यापूर्वी मुंबईतील पहिल्या टप्प्यात १६००, दुसऱ्या टप्प्यात ७००,तिसऱ्या टप्प्यात ९०० कुटुंबाना शिधा- किराणाचे वाटप करण्यात आले. तर, चौथ्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातच ६०० आदिवासी कुटुंबाना मदतीचे वाटप करण्यात आले होते. अजुनही रेल्वे बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब श्रमिक जनतेला दळणवळण पूर्ववत सुरू होईपर्यंत मदतीची नितांत गरज आहे, असे सांगून चिलगावकर म्हणाले की, या मानवतावादी कार्यासाठी सेवाभावी संस्था आणि सुस्थितीत असलेल्या लोकांनी हातभार लावला पाहिजे.


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA