Top Post Ad

कोरोना योध्द्यांना आरोग्य सुरक्षा व जीवन विमा सुरक्षा कवच  देण्याची मागणी

कोरोना योध्द्यांना आरोग्य सुरक्षा व जीवन विमा सुरक्षा कवच  देण्याची मागणी



ठाणे                    


    ठाणे शहरातील कोरोना रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणत वाढत आहे,या रोगाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महानगर पालिका विविध उपाययोजना अवलंबत आहेत. या उपाययोजना आधिक प्रभावी होण्यासाठी ठामपा कर्मचाऱ्यांच्या सोबतीला “कोविड योध्द्यांची” नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या योध्द्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य देण्यात आले नसल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीच्या सहा.आयुक्तांनी नेमलेल्या कोविड योध्द्यांना “आरोग्य सुरक्षा (Mediclaim) व जीवन विमा सुरक्षा कवच”  देण्याची मागणी ठाणे मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.  


आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कमतरते अभावी त्यांच्या सोबत पॅरामेडिकल स्टाफ म्हणून “कोविड योध्द्यांची” नेमणूक प्रभाग समितीच्या सहा.आयुक्तांच्या सहीनीशी करण्यात आली आहे.  समाजातील बरेचसे स्वयंमसेवी नागरिक यासाठी पुढे देखिल आले.  "आशा" कर्मचाऱ्यांना “आरोग्य सुरक्षा व जीवन विमा सुरक्षा कवच” देण्यात आले. कोरोना रोगाचा वाढता प्रार्दुभाव पाहता घरोघरी जाऊन सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्यांना मात्र कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याची माहिती मिळत आहे.   हे योध्दे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करताना यांच्या सुरक्षेसाठी कोणतेही सुरक्षा कवच ( पीपीई किट) परिधान केलेले नसते, अशावेळी एखाद्या कोविड रुग्णाच्या संर्पकात हे स्वयंसेवक आल्यास,त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो व अशावेळी त्यांच्या आरोग्याची व आयुष्याची  काळजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे  अशा योध्दयांना “आरोग्य सुरक्षा (मेडिक्लेम) व जीवन वीमा सुरक्षा कवच” द्यावे.कर्तव्य बजावताना अघटीत घडाल्यास त्यांच्या वारसांना ठामपा प्रशासनाने आपल्या सेवेत नोकरी द्यावी. अशी मागणी पञाद्वारे मनसे प्रभाग क्र.१४च्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com