Trending

6/recent/ticker-posts

स्मशानभूमीत 30 विविध रोपटे लावून जागतिक पर्यावरण दिवस साजरा
स्मशानभूमीत 30 विविध रोपटे लावून जागतिक पर्यावरण दिवस साजरा

 

भिवंडी

 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने दाभाड केंद्राचे केंद्रप्रमुख श्यामसुंदर दोंदे यांनी त्यांच्या वाढ वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिवंडी तालुक्यातील समतानगर पडघे येथील स्मशानभूमीत 30 विविध रोपटे लावून व बियाणे फेकून  जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला  आहे. 

 

आपण घरामध्ये आंबे, जांभळ आणतो. ही फळे खाऊन झाल्यानंतर आपण त्यांची  बी  फेकून देत असतो. परंतु केंद्रप्रमुख शामसुंदर दोंदे यांनी गेल्या वर्षी  घरात आणलेले हापूस अांबे ,जांभूळ यांच्या बिया न फेकता त्याची 30 रोपे तयार  करून  या वर्षी जमा केलेले  बाठे(200) अशोक बी,जांभूळ बीया  केंद्रप्रमुख श्यामसुंदर दोंदे  यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त  व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भिवंडी तालुक्यातील पडघा, समतानगर स्मशानभूमीत कवी  मिलिंद  जाधव  यांच्या प्रयत्नाने रोपे लागवड व बिया भिरकावून देऊन पर्यावरण संरक्षणाचा एक सामाजिक संदेश  केंद्रप्रमुख शामसुंदर दोंदे यांनी दिलेला आहे.

 

 मे महिन्यात आपण जि फळे खातो उदा.आंबा,जांभुळ, व इतर वनस्पतीच्या बिया कडूनिंब, अशोक,मोह. यांच्या बिया जमा करून जुन महिन्यात शाळा सुरू झाल्यावर सर्व शिक्षक व ६०० विद्यार्थी  माळरानात जावुन जमा केलेल्या बिया जोराने भिरकावून देतात व 'बिया फेका झाडे वाढवा'  हा उपक्रम मी दाभाड व पिसे केद्रात घेतो. परंतु लॉकडाऊन असल्याने हा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविला आहे.  असे केंद्रप्रमुख शामसुंदर दोंदे यांनी बोलताना सांगितले.

  

  

Post a Comment

0 Comments