बोगस trollerची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

बोगस troller वरून सत्ताधारी आणि विरोधकात आरपारची लढाई मुंबई


आम्ही म्हणतो तेच योग्य म्हणत इतरांना शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या बोगस troller वर तात्काळ कारवाई करावी. यासाठी आधी भाजपने पोलिसांना पत्र दिले तर आता राष्ट्रवादीने यावर कडी करत भाजपच्या काळात गेल्या 6 ते 7 वर्षात केलेल्या troller लोकांचा, आणि ज्यानी अश्लील, अपमानकारक भाषेत सतत troll केले त्या बाबत समिति नेमून तसेच त्यांचा संपूर्ण data काढून त्यांची चौकशी करून नियमानुसार (जेल मध्ये टाकून) कारवाई करण्याची मागणी गृहखात्याकड़े केली आहे. ठाण्यातील  jitendra awhad आणि करमुसे मारहाण प्रकारानंतर हे प्रकरण तापले. आता महाराष्ट्रात या troll धाड वर सत्ताधारी सरकार आणि troll धाड चे जनक यांच्यात आरपारची लढाई सुरू होण्याची चिन्हे आहेत..


ज्या बोगस फेसबूक account च्या माध्यमातुन कॉंग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे बड़े नेते यांना गेल्या 6 वर्षात अपमानास्पद रित्या troll करण्यात आले .. पंतप्रधान मोदी आणि धीरगंभीर नेते नितीन गडकरी हे ज्यांना खाजगीत आदर्श मानतात.. आणि ज्यांचे बोट धरून अनेक नेते आज राजकारणाच्या सर्वोच्च स्थानावर आहे त्या शरद पवार यांच्यावर भाडोत्री troller लोकानी आजवर अनेक वेळा हीन दर्जाची टीका केली. अशा अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या बोगस troller वर कारवाई करण्यासाठी महाआघाडी सरकारने पुढाकार घेतला आहे. बोगस troller यांचे अनेक फेक account आहेत. सोबतच यांच्या नावावर किती sim card आहेत. आणि त्या sim card वर किती फेसबूक account आहेत.. आणि त्या बोगस फेसबूक account वापर कशासाठी केल्या जातो याची चौकशी करावी..अनेक धक्कादायक बाबी उघड होतील.अशी मागणी देखील करण्यात आली आहे.


गेल्या 6 ते 7 वर्षापासुन मस्तवाल झालेले बोगस fecebook account धारक हे भाडोत्री होते आणि आहेत ही त्यांचे account पाहिल्यावर लक्षात येईल.. आय टी सेलच्या आडून या बोगस troller लोकांनी अश्लील शेरेबाजी. बदनामीकारक मिम्स, अपमानास्पद विडिओ, याच्या माध्यामातून सोनिया गांधी, ते शरद पवार, आणि भाजपा व्यतिरिक्त इतर पक्ष व नाते यांच्या विरोधात राळ उठवून यथेच्छ बदनामी केली.. या आय टी सेलची संकल्पना ही मोदी सरकारच्या पूर्वीपासून अस्तित्वात आली असा युक्तिवाद होत असला या आय टी सेल ची कार्यप्रणाली मागील काही वर्षापासून भाजपच्या सत्तेच्या आड येणार्‍या तमाम नेत्यांना बदनाम करण्यासाठी वापरली गेली असल्याचा आरोपही होत आहे.  भाजपाच्या खुराड्यात नव्याने आलेले काही नेत्यांनी फडणवीस यांच्यावर होणार्‍या troll विरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच रंगले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad