जर काही ठोस सांगायचे नसेल तर कशाला उगाच लाईव्ह येता आणि संपूर्ण देशाला गोंधळात टाकता - प्रकाश आंबेडकर
'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिडीयाला हेडलाईन तर दिली, मात्र देश मदतीच्या हेल्पलाईनची वाट बघतोय- काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला
मुंबई:
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत साठी २० लाख करोड रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. मात्र देशातील भयावह स्थिती बद्दल त्यांनी काहीही भाष्य केलेले नाही, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत मोदींवर टीका केली आहे, "जर काही ठोस सांगायचे नसेल तर कशाला उगाच लाईव्ह येता आणि संपूर्ण देशाला गोंधळात टाकता" अश्या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे. मजुरांचे स्थलांतर, सुविधा अभावी त्यांचे होणारे हाल, देशातील गरीब जनतेचा रोजच्या जगण्याचा प्रश्न, भूक, अन्नधान्य, शिधा, आरोग्याच्या सुविधा, सरकारी मदत, कोलमडून पडलेली सरकारी यंत्रणा, माहितीचा अभाव, समन्वयाचा अभाव याबद्दल ते काहीही बोलले नसल्याने जनसामान्यांमध्ये नाराजीची भावना आहे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मोदींवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत, ते म्हणाले कि, "असे दिसते आहे कि, पंतप्रधानांना स्वतःहून कोणतीही वाईट किंवा कठोर बातमी द्यायची नाही आहे, हे सर्व त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण व राज्यांमधील मुख्यमंत्री यांच्यावर सोडले आहे, हा कदाचित त्यांच्या पीआर चा भाग असावा, आणि जर पंतप्रधानांना काही ठोस सांगायचे नसेल तर ते कशाला लाईव्ह येतात आणि देशाला गोंधळात टाकतात".
'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिडीयाला हेडलाईन तर दिली, मात्र देश मदतीच्या हेल्पलाईन ची वाट बघतोय' अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला' यांनी दिली आहे. रणदीप सुरजेवाला यांनी मोदीजींच्या २० लाख करोड रुपयांच्या आर्थिक पॅकेजवर टीका करत एक ट्विट केले आहे, ते लिहितात कि, "मा. मोदीजी, तुम्ही संबोधन करून मिडीयाला बातमी चालविण्यासाठी 'हेडलाईन' तर दिली आहे मात्र देश 'मदतीच्या हेल्पलाईन' ची वाट बघत आहे, आश्वासनं प्रत्यक्षात कधी उतरतील याची आम्ही वाट बघू". मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' संकल्पासाठी २० लाख करोड रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा करत असतांना सांगितले कि, हे आर्थिक पॅकेज देशाच्या जीडीपी च्या १० टक्के एवढे आहे, हे पॅकेज देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी उपयोगी येईल, भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या संकल्पासाठी या पॅकेजमध्ये लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉया सर्व घटकांवर विशेष भर देण्यात आला आहे. रणदीप सुरजेवाला त्यांच्या दुसऱ्या ट्विट मध्ये लिहितात कि, "मा. मोदीजी, आपल्या घरी परतत असलेल्या लाखों प्रवासी मजुर बांधवांना मदतीची, त्यांच्या जखमांवर कुंकर घालण्याची, त्यांना आर्थिक सहाय्य करण्याची, आणि त्यांना सुरक्षितपणे घरी पोहचविण्याची सर्वप्रथम गरज आहे, आशा होती आपण याबाबतीत काहीतरी घोषणा कराल. राष्ट्रनिर्माण करणाऱ्या मजूर आणि कामगारांबद्दलची आपली निष्ठुरता आणि असंवेदनशीलता बघून देश नाराज आहे".
0 टिप्पण्या