हॉस्पीटल उघडले पण रूग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ

 हॉस्पीटलचे दरवाजे उघडले पण रूग्णांवर  उपचार करण्यास केली जाते टाळाटाळ


खासगी डॉक्टरांसहित त्यांच्या हॉस्पीटलवर बंदीची कारवाई करण्याची पनवेल संघर्ष समितीची मागणी


  पनवेल


 हॉस्पीटल उघडण्याचे सोंग करून रूग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणार्‍या खासगी डॉक्टरांसहित त्यांच्या हॉस्पीटलवर कायमस्वरूपाच्या बंदीची कारवाई करण्यात यावी, तसे पाऊल जिल्हाधिकारी रायगड आणि पनवेल महापालिका आयुक्तांनी त्वरीत उचलावे, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केली आहे.
 कोविड-19 च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना खासगी डॉक्टर आणि त्यांचे हॉस्पीटल बंद ठेवून रूग्णांच्या जीवाशी खेळ सुरू ठेवला आहे. सुरूवातीपासूनच ओपीडीसह हॉस्पीटल बंद ठेवून देवदूत अशी समज करून घेतलेल्या डॉक्टरांनी दार बंद करून घेतले होते. परंतु, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासह जिल्हाधिकारी निधी चौधरी, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दवाखाने, ओपीडी सुरू ठेवण्यासाठी लेखी अध्यादेश काढल्यानंतर दवाखान्यांचे दरवाजे उघडले गेले.


परंतु, चाणाक्षबुद्धीने रूग्णांवर उपचार करण्यास नकराघंटा वाजू लागली. पर्यायी, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका रूग्णाला उपचाराअभावी मृत्यू पत्करावा लागला आहे. अशा घटना वारंवार घडत असतानाही डॉक्टर कोविडच्या भीतीने उपचार करण्यास टाळाटाळ करून त्यांच्या वैद्यकीय सेवेपासून दूर पळत असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीने केली आहे.
 कोविडच्या पार्श्‍वभूमीवर प्रसुतीसाठी अडलेल्या महिलांची फार मोठी कुंंचबना होत असून त्यांच्या नातेवाईकांवर मोठी पंचाईत ओढावत असताना डॉक्टर घरी असूनही त्यांना सेवा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्याशिवाय इतर रूग्णांवरही उपचार करीत नाहीत. त्यामुळे रूग्णांची हेळसांड़ होत आहे. अशा सर्व शहरी व ग्रामीण भागातील डॉक्टर, सेमी स्पेशालिटी हॉस्पीटल, नर्सिंग होम, दवाखान्यांवर कायमच्या बंदीची आणि डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवरही बंदी घालण्याची आणि त्यांच्यावर साथीरोग 1897, हलगर्जीपणा याविषयी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी कडू यांनी केली आहे. 


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad