Top Post Ad

आरक्षण: एक विदारक झोंबनारं सत्य

आरक्षण: एक विदारक झोंबनारं सत्य

 


 

भारतात एकूण 6300 च्या वर जाती आहेत. खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत.

 

1)  *SC*  (अनुसुचित जाती)  एकूण जाती - *59*  आरक्षण - 13%.

 

2)  *ST*  (अनुसुचित जमातीं) एकूण जाती - *47*  आरक्षण - 7%.

 

3)  *OBC* (इतर मागासवर्ग)  एकूण जाती - *346*  आरक्षण - 19%.

 

4) *SBC* (विशेष मागासवर्ग)  एकूण जाती - *7*  आरक्षण - 2%.

 

5)  *VJ*  (भटक्या जमाती 'अ')  एकूण जाती - *14* आरक्षण - 3%.

 

6)  *NT - B* (भटक्या जमाती 'ब')  एकूण जाती - *35*  आरक्षण - 2.5%.

 

7) *NT - C*  (भटक्या जमाती - क)  एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%.

 

8) *NT - D*  (भटक्या जमाती - ड)  एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%.

 

*एकूण आरक्षण - 52%.*  *व ते घेणा-या एकूण जाती - 510.* 

त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणा-या एकूण जाती - *59*.

 

 तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो(0.3%) *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".*  तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात.    म्हणजे *सुधारणांचं काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दुष्परिणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्द समाजाला नव्हें.   असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोक-या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो.

*वरील सर्व 510 जाती या डॉ.बाबासाहेबांच्या उपकारावरच जगतात....... त्यांच्या*  *स्वत:च्या व त्यांच्या नेत्यांच्या पुण्याईवर नव्हें.* *पण यातील 99% जातींना या महामानवाचे* नाव घ्यायलाही लाज वाटते. यांनी त्यांना मिळणा-या फायद्याचा बाप कोण ? हे *स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली स्थिती आठवून* जरा स्वत:च्या मनालाच प्रश्न विचारावा.

 

           - शेखर कांबळे 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com