भिवंडीतील पिंपळासमधे रस्त्यावर उतरले कोरोना वाँरीयर्स

भिवंडीतील पिंपळासमधे रस्त्यावर उतरले कोरोना वाँरीयर्स
    प्रशासनाच्या मदतीला व गावच्या रक्षनासाठी महीला व गावातील तरुण बनले स्वंयंसेवकभिवंडी


कोरोना वायरस या साथीच्या संसर्ग रोगाचा वाढता प्रादुर्भाव आणि भिवंडी शहरात तसेच ग्रामिण मधील कशेळी, काल्हेर, डुंगे, कोनगांव, केवणी दिवे व आजुबाजुच्या परिसरात देखिल मोठ्या प्रमाणात प्रसार होत चालला आहे.    तसेच शासनाने मद्याची दुकाने चालु केल्याने गावामधे अधीकच भीती दायक वातावरण निर्माण झाला आहे. ज्या तालुक्यात, परिसरात, व गावांगावांत कोरोना संशयीत व कोरोना पाँझीटीव्ह आढळले आहेत म्हणजेच डोंबीवली, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी व ईतर ठीकाणांहुन तळीराम बीयर घेण्यासाठी येत आहेत व दिवसभर गर्दी घालत आहेत त्यामुळे पिंपळास गावामधे देखील कोरोनाची लागण होण्यास वेळ लागणार नाही.  यास जबाबदार कोण असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता कामणकर यांनी केला आहे. जर हे बाहेरचे लोकं गावात मद्यसाठी येत राहीले तर आम्ही गावातील महीला शांत बसणार नाहीत तर आमच्या स्टाईलने इंगा दाखवु तसेच याची खबरदारी म्हणुन पिंपळास गावातील महीला रणरागीणी व ग्रामविकास युवा प्रतिष्ठान पिंपळास, मानव सेवा हीच ईश्वर सेवा प्रतिष्ठान पिंपळास व ओम साई महीला ग्रामसंस्था पिंपळासच्या महीला रणरागीणी रस्त्यावर उतरल्या होत्या यावेळी जे गावा बाहेरील लोकं मद्य घेण्यासाठी गावात येत होते त्यांना परतवुन लावुन महीला भगिनींनी व गावातील तरुणांनी मोलाचे कामगिरी केल्याने गावातुन व परिसरातुन या सर्वांचे खुप कौतुक होत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad