Top Post Ad

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेने केल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या


 ठाणे जिल्हा परिषदेचा महत्वपूर्ण निर्णय


 कोरोनाच्या सद्यस्थितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी घेतला आढावा


ठाणे 


ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे कोव्हिडं यौध्ये शर्तीचे प्रयत्न करत आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून ठाणे जिल्हा परिषदेने आरोग्य उपकेंद्रावर समुदाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूका करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिली. आज त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. 


यावेळी यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  ब.भि.नेमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी( प्रशासन) तथा कल्याण पंचायत समिती संपर्क अधिकारी डी.वाय.जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत) तथा जिल्हा नियंत्रण अधिकारी  चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी  अधिकारी ( पाणी व स्वच्छता) तथा संपर्क अधिकारी शहापूर  छायादेवी शिसोदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास)  तथा संपर्क अधिकारी मुरबाड संतोष भोसले, शिक्षणाधिकारी तथा संपर्क अधिकारी भिवंडी संगीता भागवत,  पशुसंवर्धन अधिकारी तथा संपर्क प्रमुख अंबरनाथ डॉ.लक्ष्मण पवार, गट विकास अधिकारी शहापूर श्री. अशोक भवारी, गट विकास अधिकारी मुरबाड रमेश अवचार, गट विकास अधिकारी भिवंडी डॉ.प्रदिप घोरपडे, गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे, गट विकास अधिकारी अंबरनाथ श्वेता कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेघे, कार्यकारी अभियंता ( ग्रामीण पाणी पुरवठा ) एच. एल. भस्मे यांनी सहभाग घेतला. 


कोरोनाच्या काळात जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रावर २७  समुदाय वैद्यकीय अधिकारी यांची नव्याने नेमणूका करण्यात आल्या आहेत. हे वैदयकीय अधिकारी नागरिकांचे सर्वेक्षण करणे, कम्युनिटी ऍक्टिव्हीटी करणे आणि ओपीडी कार्यरत राहणार आहेत. या आढावा बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  कल्याण, अंबरनाथ, मुरबाड,भिवंडी, शहापूर, या पंचायत समिती स्तरावर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाची माहिती संपर्क अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी सोनवणे यांना दिली.  सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामीण भागात कोव्हिडं केअर सेंटर, उभारण्यासाठीच्या सूचना केल्या. शिवाय सध्याच्या वाढता आकडा लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वेक्षण करण्याचे सांगितले. याबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता करणे, औषध फवारणी करणे, निर्जंतुकिकरण करणे, धूर फवारणी करणे,  फिजिकल ( शारीरिक) अंतर ठेवत विविध कामे करणे, कम्युनिटी किचन द्वारे गरजूंना अन्न पुरवठा करणे, निवारा केंद्रावरील  कामगार मजुरांची काळजी घेणे आदी महत्वपूर्ण बाबीकडे कटाक्षाने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांनी केल्या. यावेळी त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला.  


 पाणी टंचाईची कामे जलद गतिने करा-   कोरोनाच्या लढाई बरोबर जिल्ह्यात पाणी टंचाई निवारण करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलद गतीने काम करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. कोरोनाचा लढा आपण सर्वांनी मिळून लढायचा आहे. त्यासाठी सगळ्यानी सहकार्याने, समन्वयाने काम करा असे श्री.सोनवणे यांनी सहकारी अधिकाऱ्यांना सांगितले. 


 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com