ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त २०० मजूरांना भोजनदान 

ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त २०० मजूरांना भोजनदान 


शहापूर 


 अखंड देशावर व राज्यावर कोरोनाच्या पडलेल्या संकटात सर्व सामान्य जनता सापडलेली असून त्यातील परप्रांतीय लोक पोटाची खळगी भरण्यासाठी आली होती परंतु कोरोना सारखं संकट देशावर आल्यामुळे लोकांची उपास मारी होत असून परप्रांतीय लोक आपल्या राज्यात  गावाकडे उपाशी भुकेल्यापोटी उन्हात चालत प्रवास करत असताना अशा गोरगरीब लोकांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब (प्रकाश ) आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्ताचे औचित्य साधून  वंचित बहुजन आघाडीचे शहापूर तालुका अध्यक्ष अनिल कांबळे यांच्या वतीने रविवारी मुंबई नाशिक महामार्गावरील  आसनगाव ते कसारा या रस्त्यालगत चालत जाणाऱ्या पुरुष , महिला ,व लहान  मुलांना जवळपास २०० गरजूना भोजनदान म्हणून बिऱ्यानीचे वाटप करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहापूर शहर अध्यक्ष आयु. सय्याजी गायकवाड, उपाध्यक्ष  प्रभाकरजी थोरात, कोषाध्यक्ष आयु. सागरजी रोकडे, उपाध्यक्ष अनंताजी भोईर, सचिव प्रा .गुरुनाथ काशीवले युवा कार्यकर्ते . विपुल पंडित, महासचिव. निखिल धनगर, प्रसिद्धी प्रमुख  राहुल ढोढरे,युवा कार्यकर्ते. प्रतीक अहिरे  व सामाजिक कार्यकर्ते विलास वारघडे आदी उपस्थित होते मा.बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा


JANATA exPRESS - https://prajasattakjanata.page/lV2-rj.html


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad