शाळा १५ जुलैनंतर सुरू हाेण्याची शक्यताशाळा १५ जुलैनंतर सुरू हाेण्याची शक्यता


नवी दिल्ली


काेराेना संकटामुळे गेल्या मार्चपासून बंद असलेल्या शाळा १५ जुलैनंतर सुरू हाेण्याची शक्यता आहे. यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. प्रत्येक दिवशी ३३ % किंवा ५५ % विद्यार्थीच शाळेत जाऊ शकतील. किती मुलांना शाळेत बाेलवायचे याचा निर्णय राज्य सरकार व शाळा प्रशासन घेईल, असे सूत्रांनी सांगितले.


विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार हात धुण्याची व्यवस्था, शाैचालय, पिण्याच्या पाण्याचे नळ यांचे प्रमाण वाढवावे लागू शकते. ५० % विद्यार्थ्यांच्या फाॅर्म्युल्याची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांना आठवड्यातून तीनदा आणि ३३ % फाॅर्म्युला लागू करणाऱ्या शाळांमध्ये आठवड्यातून दाेन दिवसच मुले शाळेत जाऊ शकतील. उर्वरित अभ्यासक्रम आॅनलाइन शिकवला जाईल. कोरोना संसर्गाची स्थिती पाहून जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये याचा आढावा घेण्यात येईल. या आधारावर शाळा सुरू करण्याच्या तारखेमध्येही बदल हाेऊ शकताे. सरकारने १ ते १५ जुलैदरम्यान सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्याची घाेषणा केली हाेती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad