शहापूरात किसन सन्मान दिन उत्साहात साजरा
शहापूरात किसन सन्मान दिन उत्साहात साजरा

 


 

शहापूर

 

शहापूर तालुक्यातील सारमाळ शिवारात शनिवारी शहापूर तालुका किसान समितीच्या वतीने किसान सन्मान दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अखिल भारतीय किसान सभे सह देशातील शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने  १६ मे हा दिवस किसन सन्मान दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी ९ वाजता  ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मौजे सारमाळ शिवारात शहापूर तालुका किसान समितीच्या वतीने किसान सन्मान दिन साजरा करण्यात आला. 

यावेळी "मी शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे, शेतकरी सन्मान झालाच पाहिजे" अशा घोषणा देण्यात आल्या व शेतकऱ्याला दरमहा रुपये दहा हजार पेन्शन व संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.

याप्रसंगी कॉ. दामोदर जामदार, कॉ. जयराम चंदे, कॉ. भगवान दळवी, कॉ. संभाजी भेरे, साथी दिपक जामदार, साथी उषा जामघरे, साथी ज्योती जामदार, कॉ. गगन जामदार, कॉ. मुक्ता जामदार आदी उपस्थित होते. 
 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad