ठाणेकर नागरिकांच्या पैशांची लूट थांबवा- श्रमिक जनता संघ

ठाणेकर नागरिकांच्या पैशांची लूट थांबवा- श्रमिक जनता संघ

 


 

ठाणे

 

ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे कामगारांना वारंवार मागणी करून ही नियमितपणे मास्क, हैंडग्लोव्ज, साबण, टावेल व इतर सुरक्षेची साधने उपलब्ध होत नसतात.   कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव मंजुर करून न घेता या वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आली आहे.  आरोग्य विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यांनी संगनमताने हा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केला आहे. या बाबतीत संबंधित अधिकारी यांनी इतकी जागरूकता दाखवून प्रस्तावाला वरिष्ठांच्या परवानगी शिवाय इतका मोठा रकमेचा केला आहे.  ते ही कोविड-१९ या संसर्गजन्य आजारासाठी सुरक्षितता प्रमाणित दर्जाचे साहित्य वगळून झालेल्या या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रकरणी सखोलपणे चौकशी करावी. तसेच पुरवठादाराला बिलाची रक्कम कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यास मनाई करून ठाणेकर नागरिकांच्या पैशांची लूट थांबवावी. अशी मागणी श्रमिक जनता संघाच्या वतीने करण्यात आली आहे. 

 

साफसफाईच्या कामात असलेल्या रस्ते सफाई, घंटागाडी, श्मशानभूमी, रुग्णालयात तसेच पाणी पुरवठा करणारे वाल्वमैन, ई. कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी साधने व अन्य कायदेशीर सुविधा पुरविण्यात नेहमीच अन्याय केला जातो. सदरील कामगार हे आपले जीव मुठीत धरून कोरोना संसर्गजन्य परिस्थिती मध्ये कार्यरत आहेत.  बेकायदेशीरपणे अप्रमाणित दर्जाचे सुरक्षा साहित्य खरेदी करून, अश्या प्रकारे कामगारांच्या जीव धोक्यात घालणारे या संबंधित अधिकार्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच जर एखाद्या कामगाराला कोरोना संसर्गाचा प्रदुर्भावाचा त्रास झाला तर या संबंधित अधिकारीनाच दोषी ठरविण्यात यावे. अशी मागणीही संघाद्वारे जगदीश खैरालिया यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad