Top Post Ad

दिवावासियांना वाढीव पाणीसाठा उपलब्ध

दिवावासियांना वाढीव पाणीसाठा उपलब्ध


ठाणे


दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या भागांमध्ये मोठ-मोठी निवासी गृहसंकुले उभी राहत आहेत. सन 2017 मध्ये दिवा शहरासाठी 21.50 एम एल डी पाणीपुरवठा मंजूर होता दिवा शहरातील लोकसंख्येचा विचार करता किमान 20 एमएलडी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता होती. या भागातील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याकारणाने दिवा शहरातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. या भागातील पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन तसेच शासन दरबारी जलसंपदा विभाग व एमआयडीसी विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. सदर पाठपुराव्याला यश येऊन दिवा शहराकरिता 10 एम एल डी पाणी उपलब्ध झाले असल्याची माहिती माजी उपमहापौर व शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी दिली.


  दिवा शहराला पाण्याचा पुरवठा हा एमआयडीसी विभागाच्या माध्यमातून करण्यात येतो मात्र याचे व्यवस्थापन नियोजन हे ठाणे महापालिकेमार्फत करण्यात येते  सदर पाणी वाढविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात होता पालकमंत्री एकनाथ शिंदे  व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने मागील वर्षी मंत्रालयात तत्कालीन मंत्री महोदय जलसंपदा विभाग एमआयडीसी विभाग यांच्या स्तरावर बैठकीचे आयोजन करून दिवा शहरा करिता 20 एम एल डी अतिरिक्त वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला होता. त्यावेळी 10 एमएलडी पाणी उपलब्ध झाले व  काही तांत्रिक कारणास्तव 10 एम एल डी  पाणी दिवा शहराला उपलब्ध होऊ शकलेले नव्हते ही वस्तुस्थिती आहे. मात्र मागील काही दिवसांपासून दिवा शहरांमध्ये अपुरा पाण्याचा पुरवठा होत असल्या बाबतच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार दाखल होत होत्या.


पाणी समस्येतून नागरिकांची सुटका व्हावी नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे  याकरिता मंजूर केलेले  10 एम एल डी अतिरिक्त पाणी आता उपलब्ध झाले असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर होणार आहे. दिवा शहरातील पाणी समस्या निकाली निघाल्याने अध्यक्षा दिवा प्रभाग समिती दिपाली भगत, सभापती-क्रीडा समाज कल्याण व सांस्कृतिक कार्यक्रम समिती अमर पाटील, नगरसेवक शैलेश पाटील, दीपक जाधव नगरसेविका दर्शना म्हात्रे, सुनिता मुंढे, अंकिता पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठामपा निवडणुकीत केलेल्या घोषणेची वचनपूर्ती झाली असल्याच्या प्रतिक्रिया दिवा शहरवासियांना कडून देऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे  व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे  यांचे जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com