Top Post Ad

 घोडबंदर रोडवरील उल्लास खाडीशेजारील बंधाऱ्याचे काम अखेर सुरू

* शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे घोडबंदर  रोडवरील उल्लास खाडीशेजारील फुटलेल्या बंधाऱ्याचे काम अखेर सुरू




ठाणे
घोडबंदर रोडवरील उल्लास खाडीशेजारी बांधण्यात आलेला ब्रिटीशकालीन बंधारा फुटला होता. या फुटलेल्या बंधाऱ्याचे काम 
 आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे   बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे खाडीच्या खाऱ्या पाण्यापासून संरक्षण होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तब्बल अडीच ते तीन हजार लहान-मोठ्या शेतकर्‍यांची शेती जमीन वाचवण्यासाठी ब्रिटीशकालीन बंधारा बांधण्यात आला होता.
हा बंधारा गेल्या पावसाळ्यात फुटला होता. या फुटलेल्या बंधाऱ्यामुळे आगामी पावसाळ्यात खाडीचे पाणी शेतात जाऊन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. या भीतीनं शेतकरी गेल्या ७ महिन्यांपासून खारलॅण्ड विभागाला बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी करत होते. अखेर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका घेत पाठपूरावा केल्यानंतर बुधवारपासून तुटलेल्या बंधाऱ्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं.  याबाबतची माहिती खारगुनी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे.  
घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा  ते वाघबिळ  पर्यंत उल्लास खाडीशेजारी ९ फूट उंच आणि १५
 फूट रुंद बंधारा बांधण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे खाडीच्या खाऱ्या पाण्यापासून संरक्षण व्हावं यासाठी ब्रिटीशांनी हा बंधारा बांधला होता.  सन १९६० साली या बंधाऱ्याची उंची आणि रुंदी वाढविण्यात आली. या बंधाऱ्याच्या बांधकामा आता ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात बंधाऱ्याला किरकोळ तडे किंवा गळती होण्याच्या घटना वारंवार घडत असत. परंतु, शेतकरी याबाबत कुणाकडेही तक्रार करण्याऐवजी स्वतःच त्याची दुरूस्ती करत होते. या बंधाऱ्याची योग्य पद्धतीनं दुरूस्ती करण्याची मागणी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करत होते
ठाणे महानगर पालिका क्षेत्राच्या अधिपत्याखाली प्रभाग क्रमांक १  मध्ये ओवळा मोगरा पाडा परिसरात ७ गावं आहेत. सुमारे ३००० शेतकरी ८०० एकरात शेती करतात.  गेल्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसात बंधारा ७ ठिकाणी फुटला होता. या बंधाऱ्याच्. दुरूस्तीची जबाबदारी खारलँड विभागाची आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी कळस येथील विभागीय कार्यालयात ओव्हल खारगुणी संस्थेमार्फत  अर्ज करण्यात आला होत. दुरूस्तीसाठी सतत पाठपुरावा करण्यात येत होता.  मात्र, लॉकडाऊनचे कारण सांगून अधिकारी टाळाटाळ करत होते. अखेर ग्रामस्थांनी स्थानिक शिवसेनेच्या नगरसेविका नम्रता रवी घरत यांच्याकडे तक्रार केली. रवी घरत यांनी स्थानिक शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना चांगेच फैलावर घेतले आणि बंधाऱ्याचे काम सुरू करण्याच्या सुचना दिल्या.  अखेर सरनाईक यांच्या कडक भूमिकेमुळे बंधाऱ्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात आले.
बंधाऱ्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची प्रतिक्रीया  लडा खारगुनी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे. या जागेवर मेट्रोचे कारशेड बनवण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यासह विविध मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिलेल्या नाहीत. या संदर्भात देखील आमदार प्रताप सरनाईक यांची अधिकाऱ्यांशी चर्चा  सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com