युजीसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे - अॅड. सिद्धार्थ  इंगळे 

युजीसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे - अॅड. सिद्धार्थ  इंगळे ठाणे 


महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) ने पुन्हा एकदा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन दिनांक १५ मे रोजी ई-मेल द्वारे सादर केले आहे.  या निवेदनाद्वारे अजून काही अति महत्वाचे मुद्दे मासूने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत जे त्यांच्या दिनांक ८ मे रोजीच्या संबोधनातुन मांडले गेले नाहीत ते खालील प्रमाणे -   .


१. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्राच्या ATKT परीक्षा होणार होत्या पण आता त्या होऊ शकणार नाही मग अश्या विद्यार्थ्यांना आपण घेतलेला निर्णय लागू होणार का?  २. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्राच्या ATKT परीक्षांचे पुनर्मुल्यांकनाचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत, जर हे निकाल वेळेवर लागले नाही अश्या विद्यार्थ्यांबद्दल कोणता निर्णय घेतला गेला किंवा घेण्यात येईल   ३. काही विद्यार्थी बॅकलॉग किंवा इयर ड्रॉप आऊट आहेत यंदा परीक्षा होत नसल्यामुळे त्यांना पुढच्या सत्रात म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ८ ते १० विषय एकत्र द्यावे लागतील त्यामुळे त्यांना ही त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे मग अश्या विद्यार्थ्यां कोणता दिलासा मिळणार आहे ?  
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यासमोर वरील मुद्दे मासूने नव्याने मांडलेले आहेत,  उदय सामंत यांनी आणि राज्य समितीने यावर नक्कीच ठोस तोडगा काढला असेलच परंतु तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्या नसल्यामुळे त्यांच्या मनात मोठा संभ्रम आणि गोंधळ निर्माण झालेला असून विद्यार्थी हे मानसिक तणावाखाली वावरत आहेत. आम्ही नव्याने मांडलेल्या या मुद्यांकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व त्यांना समान संधी देऊन युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे अशी  विनंती  मासूचे संस्थापक अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ  इंगळे यांनी  निवेदनाद्वारे केलेली आहे.  


मासुच्या प्रतिनिधींना राज्यांतील विविध जिह्यातून विद्यार्थ्यांचे फोन, मेसेजेस, ई-मेल येऊं लागले आहेत विद्यार्थी त्यांच्या अडचणी, मर्यादा आणि कोरोना मुळे लादले गेलेले निर्बंध यासगळ्या बाबी मासूच्या प्रतिनिधींसमोर मांडत आहेत. मासुद्वारे करण्यात आलेल्या विद्यार्थी सर्वेक्षणानुसार ८३टक्के विद्यार्थी हे रेड झोन मध्ये वास्तव्यास आहेत तसेच ५९. ३ टक्के विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेले आहे कि त्यांचा ५० टक्के अभ्यासक्रम लॉकडाउन सुरु होण्यापूर्वी पूर्ण झालेला आहे तर ५४. १ टक्के विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेले आहे कि त्यांचा 0टक्के अभ्यासक्रम लॉकडाउन नंतर ऑनलाईनपद्धतीने सुद्धा पूर्ण करण्यात आलेला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे सोयी सुविधांचा अभाव होय. यासाठी मासूने सुरु केलेला विद्यार्थी सर्वेचा पायचार्ट सुद्धा या निवेदनामध्ये अंतर्भूत केलेला आहे याची माहिती मासूचे राज्य सहसचिव प्रशांत जाधव यांनी दिली.  
लेनिस लोबो या अभियांत्रिकी अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने उदय सामंत यांच्या ८ मे च्या घोषणेनंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत एक ऑनलाइन याचिका सुरू केलेली आहे. लेनिस लोबोने सुरू केलेल्या ऑनलाइन याचिकेवर 40हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी केलेली आहे याची माहिती सुद्धा मासूने आपल्या निवेदनातून दिलेली आहे.    


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1