माझा न्यायव्यवस्था व न्यायालयावर अफाट विश्वास आहे. पाच वर्षांची वाट पाहणे वेदनादायक होते. पण शेवटी, न्यायालयाने न्याय दिला. मी नेहमीच विश्वास ठेवतो की मी स्वच्छ होतो. अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता (ज्wd) अनिलकुमार गायकवाड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठेवलेल्या दोषारोपातून उच्च न्यायालयाने मुक्तता केल्यानंतर व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला पूर्णत्वास नेण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अनिलकुमार गायकवाड यांच्याविरोधात 23 सप्टेंबर 2015 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक गुन्हा नोंदवला होता. त्यातून त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष म्हणून सिद्ध केलंय. या प्रकरणी 15 मार्च 2019 रोजी विशेष एसीबी कोर्टाने त्यांचा डिस्चार्ज अर्ज फेटाळल्यानंतर गायकवाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए.एम. बदर यांनी गायकवाड यांच्याविरूद्ध पुरावा नसल्यामुळे विशेष कोर्टाचा आदेश रद्दबातल ठरविला. मुंबई उच्च न्यायालयाने 19 मे रोजी त्यांना संबंधित प्रकरणातून मुक्त केले. मात्र या प्रकारामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एफ ए एंटरप्रायझेसच्या वर्ग -1 च्या कंत्राटदाराच्या नोंदीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. एसीबीने अनिलकुमार गायकवाड यांच्यासह एफ ए एंटरप्रायझेसचे साथीदार फतेह मोहम्मद खत्री आणि त्यांचे पुत्र निसार, जैतुन, आबिद आणि जाहिद यांच्यासह 23 सप्टेंबर 2015 रोजी भष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पीडब्ल्यूडी अधिकाऱयांनी 28 नोव्हेंबर, 2018 रोजी जारी केलेला शासकीय ठराव (जीआर) देखील न्यायाधीशांनी विचारात घेतला, ज्याने कंत्राटदारांद्वारे सादर केलेल्या कागदपत्रांच्या छाननीमुळे उद्भवलेल्या दंडात्मक परिणामी त्यांच्या सर्व कर्मचाऱयाना सूट देण्यात आली. जीआर मध्ये नमूद केले आहे की पीडब्ल्यूडी नोकरी करतो. कंत्राटदारांनी विभागाकडे सादर केलेल्या कागदपत्रांच्या शृंखलांचे काम सोपवले जाऊ शकते. अशा अधिकाऱयांना कागदपत्रांची छाननी केल्यास दंडात्मक परीणाम म्हणून जबाबदार धरले जाऊ शकत नाही. पीडब्ल्यूडी अभियंता अनिलकुमार गायकवाड यांच्या विरोधात आजपर्यंत फारसे पुरावे नव्हते, असे न्यायाधीशांनी नमूद केले. संपूर्ण आरोपपत्र अर्जदाराच्या वतीने गुन्हेगारी गैरवर्तन केल्याचा पुरावा दाखवून देत नाही, असे कोर्टाने सांगितले.
अनिलकुमार गायकवाड हे सद्या महाराष्ट्राच्या रस्ते विकास महामंडळाचे (श्एRअ) सह व्यवस्थापकीय संचालक असून हे पद सचिव या पोस्ट सारखेच आहे. मुंबई इलाखा शहर विभागाचे कार्यकारी अभियंता पदी असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 5 वर्षे त्यांना त्रास सोसावा लागला. जरी त्यांचे सद्याचे हे पद (सहव्यवस्थापकीय संचालक) सचिव पदासारखे असले तरी रेग्युलर सचिव नसून साईट पोस्ट आहे. जातीयवादी यंत्रणेमुळे त्यांना 5 वर्षे त्रास सहन करावा लागला असून मुळ सचिव पदापासून त्यांना लांब राहावे लागले आहे. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला कदाचित हेच अपेक्षित असावं त्यामुळेच हे सर्व षडयंत्र रचण्यात आले असावे अशी शंका आल्याशिवाय रहात नाही.
-------
अनिलकुमार गायकवाड यांच्याविषयी थोडेसे...
प्रज्ञासूर्य डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले लातूरचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बळीराम ( दादा ) शिवराम गायकवाड यांचे सुपूत्र अनिलकुमार 30 ऑक्टोबर 1963 रोजी मराठवाड्यात जन्माला आले, खरे तर मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन शासनाच्या उच्च पदावर रुजू होणे ही अत्यंत कठीण बाब. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 1989 साली महाराष्ट्राच्या सरळ भारतीच्या माध्यमातून इंजि, गायकवाड सहाय्यक कार्यकारी अभियंता पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले 1990 साली ठाणे येथील विशाल इमारत प्रकल्पाची अंमलबजावणी करणेकामी त्यांची प्रथमत वर्ग-1 पदावर नियुक्ती करण्यात आली, 1990 ते 2015 सालापर्यंत गायकवाड यांनी मुंबई प्रादेशिक बांधकाम विभागांतर्गत केलेली कामे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या लक्षात राहतील अशीच आहे,
सहाय्यक कार्यकारी अभियंता ते राज्याचे सहसचिव असा त्यांचा प्रशासकीय प्रवास थक्क करणारा आहे, मुंबईमध्ये धोकादायक इमारतीचे यशस्वी पुनर्वसन प्रतिष्ठित इमारतीच्या बांधकामाची यशस्वी अंमलबजावणी पनवेल आणि नाव्हा-सेवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामाची इंजि, गायकवाड यांनी अत्यंत कार्यकुशलतेने अंमलबजावणी केली ,1999 मध्ये महाराष्ट्रात शासनाच्या बांधकाम विभागाकडून बेस्ट इंजिनियर हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्यात ते यशस्वी ठरले , 2005 मध्ये त्यांच्या प्रशासकीय कामाची दखल घेऊन दिल्ली इन्स्टिट्यूट कडून उत्कृष्ट कार्याचा गौरव पुरस्कार देखील अनिलकुमार गायकवाड यांना मिळाला, 2007 मध्ये अभियंता दिवसाच्या अनुषंगाने सरकारच्या आर्थिक बचत आणि नवीन प्रकल्पाच्या कल्पनांची कार्यवाही केल्यामुळे भारत सरकार कडून 1 लाखाचा सांघिक पुरस्कार मिळविण्यात अनिलकुमार गायकवाड यशस्वी ठरले.
2017 साली पदोन्नती झाल्यानंतर इंजि, अनिलकुमार गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळात सहसचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या संधीचे त्यांनी खऱया अर्थाने सोने केले,
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या भूखंड प्राप्त झाल्यानंतर या नवीन महाराष्ट्र सदनाचा आराखडा तयार करताना त्यांची कल्पकता दिसते, नवीन महाराष्ट्र सदनात सर्व आधुनिक सुखसोयी उपलब्ध करून देताना त्यांचे प्रशासकीय नियोजन व वास्तुकलेतील कौशल्य निश्चितच कौतुकास पात्र आहे , प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी तसेच न्याय संस्थेतील महत्त्वाच्या व्यक्ती एवढेच नाही तर सामान्यातील सामान्य व्यक्तीपर्यंत त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते दृढ झाले आहे, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱयांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या सेवा विषयक बाबी, विविध कल्याणाच्या योजना आणि कर्मचाऱयांना मानवतेच्या दृष्टिकोनातून जवळीकतेने वागण्याची अनिलकुमार गायकवाड यांची सहहद्दयी दृष्टी त्यांच्या कार्यातून आणि कृतीतून दिसून येते.
- संकलन : सुबोध शाक्यरत्न
0 टिप्पण्या