दाभाड व पिसे केंद्रातील  २८ शाळेतील मुख्याध्यापकांना ऑनलाइन  मार्गदर्शन  
दाभाड व पिसे केंद्रातील  २८ शाळेतील मुख्याध्यापकांना ऑनलाइन  मार्गदर्शन  

 


 

भिवंडी

 

कोरोना  विषाणूच्या  संसर्गाला  आळा घालण्यासाठी सध्या पूर्ण देश लॉकडाऊन  आहे. लॉकडाऊनमुळे  जिल्हा परिषद शाळांचे देखील कामकाज ठप्प झालेले आहेत. तर शाळांना सुट्ट्या जाहीर झालेला आहेत. परंतु शिक्षकांच्या शैक्षणिक कामांमध्ये  कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. व कोविड-१९ या आजारामुळे शासनाच्या आदेशाप्रमाणे  भिवंडी तालुक्यातील  दाभाड व पिसे  केंद्रातील एकुण २८ शाळेतील मुख्याध्यापकांना ऑनलाइन  मार्गदर्शन  झुम अँपच्या माध्यमातून दाभाड व पिसे केद्रातील केद्रप्रमुख  शामसुंदर दोंदे यांनी दिले.

 

‘शाळा बंद पण शिक्षण सुरू'’ या विषयावर शासनाने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ‘लर्निंग फ्रॉम होम’साठी विविध शेक्षणिक ब्लॉग, वेबसाईट, दिक्षा अँप, बोलो, स्वयंप्रभा, गुगल क्लास, पाठशाला, ई बालभारती, एस.एम.एस., टीव्ही, रेडिओ याद्वारे पालक व विद्यार्थी यांना अभ्यासाबाबत जागृती करणे. शाळा बंद असल्या तरीही शिक्षण चालु ठेवणे. कोविड १९ बाबत विद्यार्थी जनजागृती करून आजाराबाबत असलेली समाजातील भीती घालवतील यासाठी ‘विद्यार्थी कोविड योद्धा’ यशोगाथा तयार करणे. अशा विविध अॅप कसे वापरावेत व ते वापरताना धोके कोणते व कोणती काळजी घ्यावी, स्वतः व समाजातील सर्वाची या आजारात  काळजी कशी घ्यावी, या बाबतीत ‘एससीईआरटी’चे संचालक दिनकर पाटील, ठाणे ‘डायट’चे  प्राचार्य जावळे, ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी ( प्राथ.) संगिता भागवत, भिवंडी गटशिक्षणाधिकारी निळम पाटील यांच्या सूचनेनुसार झुम अँपच्या माध्यमातून लॉकडाऊन काळातही  दाभाड व पिसे केद्रातील मुख्याध्यापकांना केद्रप्रमुख शामसुंदर दोंदे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन दिले आहे.


 

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad