पाणीटंचाई आणि वेशीबंदीचे शहापुरमधील गावकऱ्यांवर दुहेरी संकट 

पाणीटंचाई आणि वेशीबंदीचे शहापुरमधील गावकऱ्यांवर दुहेरी संकट शहापूर


शहापूर तालुक्यांला दरवर्षी उन्हाळय़ात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होऊ लागले आहे. परंतु ग्रामस्थांनी वेशी बंदी केल्यामुळे टँकरचालकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामीण भागातील अनेक गावांच्या वेशी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बंद केल्या आहेत. ज्या ठिकाणी या विषाणूचा प्रादुर्भाव फारसा नाही तेथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असे असतानाही काही गावांमधील वेशीबंदीसाठी आग्रह धरला जात असून दादागिरीचे प्रकारही केले जात आहेत. . त्यामुळे टँकरच्या वाहतुकीवरदेखील अडथळे उभे राहात आहेत. विहिरीत पाण्याचे टँकर रिते केल्यानंतर पुन्हा गावच्या वेशी बंद केल्या जात आहेत.


शहापूर तालुक्यात सध्या १८८ गावपाडय़ांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.  महिनाभरात शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाडय़ांची संख्या २१६ पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात सध्याच्या घडीला ५६२ गावे आणि १६४ पाडय़ांमध्ये पाण्याची टंचाई आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयाकडून प्रांत कार्यालयाला टँकरची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तालुक्यातील ४२ गावे आणि १४५ पाडय़ांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ३३ टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी दिली आहे. आणखी ३ टँकरची आवश्यकता असून त्यातून १० गावे आणि १९ पाडय़ांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले. मात्र ही व्यवस्था पुरेशी नसल्याची ओरड आता होते आहे.  टँकरची संख्या वाढवण्याची मागणी अनेक ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या भागांतील पाणीप्रश्न बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.


 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA