कष्टकरी कामगार असंघटित मजूर यांचे कर्ज माफ करावे

कष्टकरी कामगार असंघटित मजूर यांनी प्राईवेट स्मॉल फायनान्स कंपन्याकडुन घेतलेले कर्ज माफ करावे

 

मुंबई

 

भारतात रोजंदारीवर काम करणारे सद्यस्थितित घरातच बसून आहेत. असंघटित क्षेत्रात काम करणारे सुमारे ४० कोटी लोक गरिबीच्या खाईत गेले आहेत.कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे महाभयानक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.सगळ्यात जास्त फटका असंघटित रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर पडला आहे. त्या अनुषंगाने झोपडपट्टी व ग्रामीण भागातील जनतेच्या मनात विश्वासाची भावना निर्माण व्हावी, त्यांच्या मनातील आर्थिक कोंडीची भीती दूर व्हावी यासाठी  बँक , फायनान्स कंपन्या , प्राइवेट फायनान्स कंपन्या मायक्रो फायनान्स बचत गटयांच्या कडून झोपडपट्टी मधील असंघटित कामगार  बांधकाम मजूर, कागद कचरा वेचक, कंत्राटी कामगार,हातगाडीवाले, सोसायटीतील सफाई कामगार,धुणभांडीकणाऱ्या कष्टकरी महिला, ऊसतोडणी कामगार, बेकरी कामगार, ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर  आशा विविध आस्थापना मधील असंघटित कष्टकरी कामगार यांनी   वरील वित्त कंपणींनकडून घेतलेले ३०,०००रू आतील कर्ज  सरकारने त्वरीत माफ करावे. अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

भारताची अर्थव्यवस्था या कोरोना व्हायरसमुळे पूर्वपदावर यायला पाच ते सहा वर्षे लागतील व या प्रक्रियेमध्ये बरीच समीकरणे बदलतील. या पूर्ण प्रक्रियेत मात्र कोरोना व्हायरसमुळे कमी व गरिबीमुळे जास्त लोक मेल्याचे देशभरात आढळून येईल. सरकारबद्दल गोरगरिब जनतेमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने सरकारने कष्टकरी मजूरांचे कर्ज माफ करावे. अशी मागणी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने पत्राद्वारे सरकारकडे केली आहे. 

 


 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad