अन्यथा नियम पुन्हा कडक करावे लागतील- मुख्यमंत्रीअन्यथा नियम पुन्हा कडक करावे लागतील- मुख्यमंत्रीमुंबई


तीन मे नंतर लॉकडाऊनचं काय? हा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येईल. अर्थचक्र रुतलं मान्य, पण तुम्ही सगळे जवान राज्याची संपत्ती आहात. जनता ही राज्य आणि देशाची संपत्ती आहे. मुंबई आणि परिसर, पुणे आणि आसपासचा भाग, नागपूर, औरंगाबाद हे रेड झोन आहेत. रेड झोनमध्ये कडक नियम पाळावे लागतील. ग्रीन-झोनमधील अटी-शर्थी कमी करत आहोत. पण नियमांचे पालन करा. अन्यथा नियम पुन्हा कडक करावे लागतील. असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जनतेशी संवाद साधला. 


शेती-शेतकऱ्यांवर कोणतंही बंधन नाही. बी बियाणे, शेती जशी चालू आहे, तशीच चालू राहील. मालवाहतूक सुरु केली आहे. हळूहळू बंधनं उठवत आहोत. पण झुंबड झाली तर पुन्हा बंधनं टाकावी लागेल. तीन तारखेनंतर आपण आतापेक्षा अधिक मोकळीक देणार आहोत, पण गर्दी नको, अन्यथा पुन्हा बंधनं टाकावी लागतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


ही टाळेबंदी नाही, तर गतिरोधक आहे. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनसाठी सर्किट ब्रेकर शब्द वापरला. कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लॉकडाउनचा उपयोग केला. यात महाराष्ट्राच्या जनतेने मोठी साथ दिली. आपण कोरोनाची साखळी तोडली नसती तर आकडा कितीतरी वाढला असता, असे मुख्यमंत्री म्हणाले. ऑक्सिमीटरच्या मदतीने दोन लाख तपासण्या करण्यात आल्या. यांमध्ये 272 जणांमध्ये ऑक्सिजन मात्रा कमी किंवा इतर व्याधी असलेले सापडले लोक सापडले.  मुंबई आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौरांनी पुन्हा परिचारिका म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी वीस हजार कोविड योद्धे तयार आहेत. त्यापैकी दहा हजार योद्ध्यांना प्रशिक्षण देत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.   इतर राज्यात अडकलेल्या लोकांना परत आणायचं आहे. परराज्यातील मजूर, पर्यटक यांना ने-आण करण्याची व्यवस्था करत आहोत. तसेच परराज्यात जाण्यासाठी लोकांनी गर्दी करू नका असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA