Top Post Ad

रेशन दुकान निलंबित झाल्याने नागरिकांची दुकान नजीक देण्याची मागणी

राठोडी गावचे रेशन दुकान निलंबित झाल्याने नागरिकांची दुकान नजीक देण्याची मागणी


मुंबई



सरकारने देऊ केलेले मोफत तांदूळ दुकान क्रमांक ४२ग १९४या रेशन दुकानदारने तक्रारदार सुरेश वाघमारे  याना नाकरल्यामुळे दोषी आढळून आल्याने दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी दुकानाचे प्राधिकार पत्र परवाना निलंबित करण्यात आल्यामुळे सदर दुकान   आजमीनगर या  ठिकाणी  वर्ग करण्यात आल्याने राठोडी गाव येथील कार्ड धारकांची आजमीनगर येथील दुकानं क्रमांक ४२ग २९७ या दुकानाचे हस्तांतरण {शिधा वाटप सुविधा} तात्काळ राठोडी गाव मध्ये  करण्यात यावे अशी मागणी  वाघमारे यांनी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ याना ट्विटर द्वारे केली आहे.


 याबाबत   येथील  जनतेने सदर दुकानावर कारवाई झाली ती रास्त असून दुकान  खूप  दूर दिल्याने अधिकाऱयांनी  जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये दुकान दुर देऊन  संभ्रम निर्माण केला आहे सदर दुकानाला पूर्ववत करण्यासाठी काही  राजकीय पाठबळ मिळत असून दुकांदार  आहे मी  कुठल्याही प्रलोभनास बळी पडत नसल्याचे बघून  माझ्याविरुद्ध गेलेल्या जनतेस भडकविण्याचे षडयंत्र आखीत आहे या गंभीर घटनेकडे अन्न पुरवठा मंत्री भुजबळ साहेबानी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन ८ दिवसाच्या आत राठोडी गाव येथे शिधावाटप दुकान हलविण्यात यावे घरातच अन्न त्याग आंदोलन जनहितार्थ  केल्या जाईल असे सुरेश वाघमारे यांनी  सांगितले


सध्या पोलीस प्रशासनावर प्रचंड ताण तणाव असल्यामुळे आपण  अन्न त्याग आंदोलन माघे घ्यावे असे आवाहन   मालवणी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड यांनी सुचविल्यामुळे सदर आंदोलन  तूर्तास पुढे ढकलले आहे एकीकडे   महेश पाठक राज्य सचिव यांच्या सारख्या उच्च पदावर असलेल्यांकडून खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी आणि जाणीवपूर्वक जनतेच्या मनात दुकान दूर गेल्याचा रोष या सारख्या घटनेमुळे वाघमारे कुटुंब दहशतीखाली जगत असून अन्याविरुद्ध आवाज बुलंद केल्याने मानसिक तणाव सहन करावा लागत असल्याची खंत वाघमारे यांनी व्यक्त केली.


 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com