Top Post Ad

नगरसेवक नरेश मणेरा यांच्या वतीने प्रभागातील ३५० कुटुंबांना धान्य वाटप

नगरसेवक नरेश मणेरा यांच्या वतीने आज प्रभागातील गोरगरीब ३५० कुटुंबांना तांदूळ,गहू,तूरडाळ,कांदे,बटाटे चे वाटप


ठाणे


काही लोकांचं जीवन व रोजचं जगणं हे हातावर असतं. ह्यांनी आज कमावलं तर रात्रीच जेवण होतं, अशी परिस्थिती रोजंदारीवर राबणारे कचरावेचक, रिक्षा चालक, हमाल. पेंटर, सफाई कामगार, घरेलू कामगार, कपड्याच्या, व अन्य दुकानात काम करणारे विविध क्षेत्रातील असुरक्षित कष्टकरी कोरोनाच्या महासंकटात सापडले आहेत. ह्यांचं घर कसं चालायचं, हा मोठाच प्रश्न आहे. ज्या लोकांचं जगणं त्यांच्या हातावर आहे. पण लॉकडाऊन मुळे - कोरोना साथी मुळे त्यांना रोजगार मिळत नाही. कुठेही जाता येत नाही. घरीच बसून आहेत. अशा लोकांसाठी प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक नरेश मणेरा  यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील मोलमजुरी करणाऱ्या गोरगरीब जनतेला लॉकडाऊन सुरु असल्यापासून जेवणाची सोय केली गेली   नगरसेवक नरेश मणेरा यांच्या वतीने आज प्रभागातील गोरगरीब ३५० कुटुंबांना तांदूळ,गहू,तूरडाळ,कांदे,बटाटे चे वाटप करण्यात आले,या प्रसंगी विभागप्रमुख मुकेश ठोंबरे, उपविभागप्रमुख माया पाटील, शाखाप्रमुख जयवंत म्हात्रे,किशोर गुळवी,दत्ता मणेरा, सुधीर महमुंकर, सुनील मणेरा, डॉ.सुरेश भोसले,बाळू पाटील,भारत शेळके,कल्पेश पाटील,यश पाटील,विशाल तरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com