जागतिक स्तरावरील मदतीच्या पॅकेजने दिला बेस मेटलच्या किंमतींना आधार
मुंबई
मंगळवारी भारतीय बाजार बंद होताना एमएमईवर लेड वगळता इतर बेस मेटलच्या किंमती सकारात्मक दिसून आल्या. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलनचे प्रमुख विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले की लेडच्या किंमतीत १.५७ टक्के घसरण दिसली. चीनमध्ये मागणीत सुधारणेची आशा होती. तसेच प्रमुख केंद्रीय बँकांनी प्रोत्साहनपर उपाययोजना आखल्याने औद्योगिक धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. मार्च २०२० मध्ये चीनने कारखान्यांमधील कामकाज जोमाने सुरू केल्यानेही किंमतींना आधार मिळाला.
आंतरराष्ट्रीय एजन्सीने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेबाबत अनेक नकारात्मक अहवाल दिल्याने गुंतवणूकदारांनी मंगळवारी सोन्याच्या मालमत्तेवरच विश्वास दर्शवल्याचे श्री माल्या यांनी सांगितले. स्पॉट गोल्डच्या किंमती ०.८ टक्क्यांनी वाढून १७२७.७ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले की, जागतिक अर्थव्यवस्था २०२० मध्ये ३ टक्क्यांपर्यंत आकुंचन पावू शकते. कारण जगभरातील आर्थिक घडामोडींमध्ये घसरण झाली आहे. १९३० च्या महामंदीनंतर सर्वात मोठ्या घसरणीसाठी ही स्थिती कारणीभूत ठरू शकते.
मंगळवारी स्पॉट सिल्व्हरचे भाव २.३३ टक्क्यांनी वाढून १५.८ डॉलर प्रति औसांच्या स्तरावर बंद झाले. एमसीएक्सवर किंमती ०.५८% नी वाढून ४३, ७५६ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाल्या.
तेल उत्पादनात कपातीवर ओपेक प्लस देशांदरम्यान ऐतिहासिक करार होऊनही मंगळवार कच्च्या तेलाच्या किंमतींसाठी चांगला दिवस ठरला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत १० टक्क्यांची घसरण दिसून आली. ती २०.१ डॉलर प्रति बॅरल एवढ्यावर बंद झाली. मागील आठवड्यात ओपेक आणि सहकारी देशांनी ठराविक मुदतीत उत्पादन कपात करत दररोज १९.५ मिलियन बॅरलनी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. असे असले ती सध्या औद्योगिक कामकाज ठप्प आहे. विमान सेवाचे मागणी व इतर रस्ते मार्ग बंद असल्याने इतर साधनांवरही याचा मोठा परिणाम झाला असल्याचे माल्या यांनी सांगितले.
0 टिप्पण्या