Top Post Ad

 शहापुर तालुक्यात कोरोना  तपासणी केंद्र उभारण्याची मागणी 

 शहापुर तालुक्यात कोरोना  तपासणी केंद्र उभारण्याची मागणी 


शहापूर


 तालुक्यात कोरोना तपासणी केंद्र उपलब्ध नसल्याने संक्षयित व्याक्तिंना कोरोना सदृश्य तपासणी करण्यासाठी मुंबई,ठाणे व भिवंडी येथे जावे लागत आहे.परंतु सदर विभागांत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण मोठ्याप्रमाणात असल्याने संक्षयित रूग्नांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी भितीही नागरिकांना वाटत आहे. असे निवेदनात म्हटले आहे . ही परिस्थिती पाहता तात्काळ शहापुर तालुक्यात कोरोना सदृश्य(टेस्ट लॅब) तपासणी केंद्र सुरु करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे . कोरोना तपासणी केंद्र उभारल्यास शहापुर तालुक्यांतील कोरोना सारखी लक्षणे असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात तपासणीसाठी स्वताहुन पुढे येतील. शहापुर तालुक्यात कोरोना तपासणी केंद्र ( टेस्ट लॅब  )उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आरोग्य प्रशासनाकडे शहापूर नगरपंचायतीचे नगरसेवक हरेश पष्टे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  यामुळे कोरोनाचे निदान लवकरात लवकर होवुन नागरिकांची भिती व शंका निघून शासनास कोरोनामुक्त अभियान जलद गतीने राबविता येईल असे पष्टे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .


शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने सध्या शहापुर तालुका आरोग्य केंद्रातुन येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडू कोरोनाच्या लक्षणांची माहिती घेतली जाते आहे .परंतु ते कोणत्याही प्रकारची तपासणी करत नाही. लक्षण वाटल्यास त्या व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी सांगितल्या प्रमाणे उपजिल्हा रुग्णालय येथे गेल्यास लक्षण विचारात घेवुन पुढे ठाणे येथे जिल्हा रूग्णालय येथे जाण्यास सांगितले जाते. पुन्हा हा संशयित रुग्ण ठाणे येथे जाणार तेथे त्याची टेस्ट होणे त्यांचे रिपोर्ट येणे या सर्व प्रोसेस मध्ये लोकांचा जास्तीचा वेळ जातो आहे. शक्यता कोरोना सदृश्य(टेस्ट लॅब) तपासणी करणार्या नागरिकांना मुंबई,ठाणे व भिवंडी येथे तपासणीसाठी  पाठविले जाते आहे येथे गेल्यास कोरोना तपासणी होण्याऐवजी कोरोनाची लागण होण्याची शक्यता व भीती नाकारता येत नाही.यामुळे तपासणी करून घेणार्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. नागरीकांची ही भिती व शंका दुर होण्यासाठी शहापूूूर तालुक्यातच तपासणी केंद्र उभारण्याची मागणी हरेश पष्टे यांनी केली असून याबाबत शहापूर नगरपंचायत प्रशासन , शहापूर तहसीलदार , व स्थानिक आमदार यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आल्याचे नगरसेवक हरेश पष्टे यांनी सांगितले आहे .



 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com