Trending

6/recent/ticker-posts

सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या फेक व्हीडीओंचे वास्तव

सोशल मिडीयावर प्रसारित होणाऱ्या फेक व्हीडीओंचे वास्तव

 


 

सोशल मिडीयावर सध्या विशेषत मुस्लीम समाजा बद्दल व्हायरल होणारे सारे व्हिडीओ टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, BBC, The Quint आणि Alt न्युज तर्फे फेक ठरविण्यात आले आहेत.*

 

 १] पहिला व्हिडीओ जो वायरल करण्यात आला, तो एका टोपी घातलेल्या युवकाचा आहे. तो युवक चमच्यात भाजी घेऊन त्यावर थुंकत आहेत, असे व्हिडीओ मधून प्रतीत होते. त्यानंतर व्हिडीओतील सारे एकत्र येऊन दुआ करतात.*

         हा व्हिडीओ २०१८ चा आहे. व्हिडीओमध्ये दाखविलेल्या क्रियेला " दम करणे " म्हणतात. आपण जे अन्न खातो किंवा पाणी पितो, त्यामधून आपल्याला लाभ प्राप्त व्हावा. अल्लाहची कृपा आपल्यावर असावी यासाठी मुस्लिम समाजातील काही लोक अन्नपाण्यावर " दम " करतात. म्हणजे अल्लाहकडे दुआ करून, काही आयतींचे पठन करून, अन्नपाण्यावर " फुंकतात " ( थुंकतात नव्हे बरं का ?)

      अनेक मस्जिद आणि दर्गाबाहेर शेकडोच्या संख्येने हिंदू बांधव पाण्याच्या बाटल्या घेऊन मौलानाकडून " दम " करवून घेण्यासाठी रांगा लावतात, हे सर्वज्ञात आहे. व्हिडीओमध्ये दाखवलेला प्रकार नेमका हाच आहे.


 

२] दुसऱ्या व्हिडीओमध्ये काही मुस्लिम युवक मस्जिदीत जेवणाचे ताट चाटत असल्याचे दाखविण्यात आले आहे.* 

     *हा व्हिडीओ जुलै २०१८ चा आहे. बोहरा मस्जिदीतील एका कार्यक्रमानंतरच्या भोजन बैठकीतील हा व्हिडीओ आहे. मुस्लिम समाजात आजही ही परंपरा आहे की जेव्हा मस्जिदीत समाज भोजनाची व्यवस्था केली जाते, तेव्हा एकाच ताटात तीन-तीन चार-चार लोक एकत्र बसून जेवण करतात. जातीव्यवस्थेची उतरंड नसल्याने हे मुस्लिमांना शक्यही आहे. असो. तर या व्हिडीओमध्ये एकाच ताटात दोन-दोन, तीन-तीन, चार-चार बोहरी युवक एकत्र बसून जेवत असल्याचे दिसत आहे. जेवण झाल्यावर त्यांच्यापैकी काही युवक ताट चाटत असल्याचे दिसते. हा देखील मुस्लिम समाज परंपरेचा भाग आहे. अन्नाचा प्रत्येक कण अल्लाहतर्फे एक कृपा आहे, असे समजून धर्माचरणी मुस्लिम अन्नाचा एक कणही वाया जाऊ देत नाही. जेवल्यानंतर बोटांनी सारे ताट पुसून घेतले जाते. यासाठी काही जण आपल्या स्वभावानुसार हाताच्या बोटांनी ताट पुसून बोटं चोखतात, तर काही जण त्यांच्या स्वभावानुसार ताट चाटून पुसून साफ करतात. व्हिडीओमध्ये तेच दिसत आहे.*


 

३] तिसऱ्या व्हिडीओमध्ये एक संशयित कोरोनाबाधित रुग्ण पोलिसांवर थुंकत असल्याचे दिसत आहे.*

     *या व्हिडीओ फेब्रुवारी २०२० चा आहे. मुंबई मिररने या वृत्तपत्राने त्यांच्या पोर्टलवर हा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ एका स्थानिक गुन्हेगाराचा आहे. या व्हिडीओचा कोरोनाशी काहीच संबंध नाही.*


 

४] प्लास्टिकच्या पाकिटात एक टोपीधरी मुस्लिम व्यक्ती थुंकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.*

     *मुळात हा व्हिडीओ थुंकण्याचा नव्हे तर फुंकण्याचा आहे. प्लास्टिकच्या पिशव्या उघडण्यासाठी दुकानदार सामान्यतः हाताने चोळतात किंवा फुंकतात. या व्हिडीओमध्ये दुकानदार फुंकत आहे. हा व्हिडीओ कोरोनापूर्वीचा आहे. या व्हिडीओचा कोरोनाच्या प्रसारशी काही संबंध नाही.*


 

५] एक व्हिडीओ निजामुद्दीन मर्कजचा म्हणून व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये मस्जिदीतल सारेच सामुहिकपणे फुंकत असल्याचे दिसत आहे.*

     *हा व्हिडीओ कित्येक वर्ष जुना असून " पाकिस्तानच्या एका सुफी मस्जिदीचा " व्हिडीओ आहे. ही सुफी धर्मातील एक विकृत उपासना पद्धती आहे. याचा कोरोनाशी काही संबंध नाही. अशा अनेक विकृत रूढी आणि परंपरा तब्लीग जमात, अहले हदीस आणि जमाते इस्लामीमुळे बंद पडल्या आहेत.*


 

    आज मात्र तबलीग प्रकरणानंतर काय वातावरण झाले आहे. समाजात किती  असंतोष पसरवला जात आहे. प्रत्येक बाब धर्माच्याच भिंगातुन  दाखवण्याचा प्रयत्न चालु आहे.मूलतः कोणतीही बातमी त्याची पूर्णतः चौकशी केल्याशिवाय फोरवर्ड करणे म्हणजे " अफवा पसरविणे " आहे. दुखाची बाब ही आहे की " मुस्लिम विरोधासाठी " नैतिक पातळीचा निच्चांक गाठला जात आहे. कसलीच लाज लज्जा न बाळगता, अत्यंत निर्लज्जपणे खोट्या आणि बनावटी बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. प्रत्येक भारतीयाने आज अशा कसोटीच्या काळात  जातीयवादी शक्तींचे समाजात जातीयवाद पसरवून समाजात फुट पाडण्याचे त्यांचे सर्व मनसुबे आपन सर्वांनी एकत्र येऊन हाणून पाडले पाहिजेत.

 

-- अरुणा नारायण गायकवाड ( वडाळा मुंबई)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या