त्या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी
ठाणे :
दिवे, मोबाईल टॉर्च प्रज्वलित करण्याच्या आवाहनावर घोडबंदर रोड येथील रहिवासी अनंत करमुसे यांनी कमेंट केली होती. त्यावरुन गणवेशातील दोघा पोलिसांसह चौघा जणांनी करमुसे यांना १५ ते २० जणांनी मारहाण केली. पोलिसांच्याच फायबर काठीने मारहाण झाली असल्याचा करमुसे यांचा आरोप आहे. फेसबूक कमेंटमुळे झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची गरज आहे. फिर्यादीला मारहाण केल्यानंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यात फिर्यादीला आणण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार केळकर आणि डावखरे यांनी केली आहे.
मात्र ‘आपल्या नेत्यांबद्दल असं केले असते तर? पूर्वी तुमच्या नेतृत्वाविषयी बोलले तरी जेल मध्ये टाकले जायचे. त्याचे फेसबुक तपासा मग बोला. विकृतिचे समर्थन करता आहात’ असा प्रतिवाद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
ठाणे मधील, एका युवकाला ,जबर मारहाण झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. भाजपचे विधानपरिषेदेतील आमदार, निरंजन डावखरे यांनी, ट्विटर वरून ते निदर्शनास आणून दिले आहे. फेसबुक व ट्विटर वरील प्रोफाइल पाहता, हा युवक संघ परिवार-भाजप शी संबंधित आहे हे लक्षात येते. भाजप विरोधी पक्ष, प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस च्या विरोधात, पोस्ट, हा युवक लिहीत आला आहे. अत्यंत गलिच्छ व विकृत भाषा आणि फोटो यांचा प्रसार या युवकाने आपल्या फेसबुक वॉलवर केला आहे. यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातही अत्यंत गलिच्छ पोस्ट त्याने टाकली होती.
एकूण भाजप चे नेते व कार्यकतें, मारहाणीचा निषेध करत कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत आहेत. संबंधित युवकाने जो विकृत आणि गलिच्छ आशय पसरवला त्याविषयी त्यांनी मौन ठेवले आहे. तर दुसरीकडे भाजप विरोधक, भाजप ने सत्तेत असताना ,विरोधकांना , विरोधात पोस्ट लिहिल्याबद्दल त्रास दिला. हा मुद्दा मांडून भाजप नेत्यांना नैतिक अधिकार नाही. हा मुद्दा मांडत आहेत. तसेच संबंधित युवकाने जो आक्षेपार्ह आशय लिहिला त्याविषयी प्रश्न उपस्थित करत आहेत
मागच्याच आठवड्यात, महिला पत्रकाराचे, ट्विटर वर चारित्र्यहनन करण्याच्या संबंधात, विजयाराजे जाधव नामक, नाशिक मधील, भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक झाली . स्वाती चतुर्वेदी यांनी ‘आय एम अ ट्रोल ‘ (मराठी भाषांतर मुग्धा कर्णिक) या पुस्तकामध्ये ,पुराव्यासह ,भाजप ने देशात ट्रोल आर्मी तयार केली आहे. यावर प्रकाश टाकला आहे. विरोधकांचा, पत्रकारांचा गलिच्छ भाषा व विकृत विचार, या द्वारे, ऑनलाइन छळ करण्याचे काम, अहोरात्र, ही आर्मी करते. बऱ्याचदा ते फेक अकाऊंट काढतात. त्यांना त्यासाठी भाजप कडून पैसे दिले जातात. खुद्द पंतप्रधान महिलांना गलिच्छ शिवीगाळ करण्याऱ्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अनेक ट्रोल्स ला फॉलो करतात. अशा ट्रोल्स विरोधात मागच्या सरकारच्या काळात अनेक तक्रारी केल्या गेल्या. पण त्यांच्यावर कधीच कारवाई झाली नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली तर त्यांचे मनोबल कमी होईल. असा आग्रह नेटकऱ्यांकडून केला जात आहे
0 टिप्पण्या