वंचित बहुजन आघाडीकडून आदीवासीं पाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
शहापूर
देशात कोरोनाने हाहाकार माजवला असल्यामुळे सरकार कडून संचारबंदी घोषित केली आहे यामुळे रोजगाराची साधने बंद झाली परिणामी गोर गरीब लोकांवर उपासमारीचे संकट कोसळण्याची भीती पाहता यासाठी सर्व तळागळातील सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत अशाच प्रकारे आपली सामजीक बांधिलकी जपत अनेक संस्था, संघटना, मंडळे, राजकीय पक्ष गरीब लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे . गरीब आदिवासींच्या रोजीरोटीचा गंभीर प्रश्न उभा राहिल्याने त्यांच्या मदतीसाठी शहापूरात आता वंचित बहुजन आघाडीने मदतीचा हात पुढे केला आहे. शहापूर तालुकाध्यक्ष अनिल कांबळे यांंच्या पुढाकाराने तालुक्यातील वासिंंद व किन्हवली परिसरातील गोरगरीब लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक अशा वस्तूंचे वाटप नुकतेच करण्यात आले . वासिंद आणि किन्हवली भागातील गाव खेड्यांवर जाऊन प्रत्येक कुटुंबास जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याची पाकिटे वाटप करून मदत केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनंत भोईर , प्रभाकर थोरात , विपुल पंडित , सागर रोकडे, रवी भवार, प्रतीक आहीरे , गुरुनाथ कशिवले , किन्हवली विभाग अध्यक्ष शंकर गायकवाड , उपाध्यक्ष विकास वाढविंदे वाशिंद विभाग अध्यक्ष योगेश साळवे, दिनेश साळवे, बागुल ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते .दुर्गम भागातील जनतेला मदतीची गरज असून सर्वानी आपल्या परीने शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन यावेळी वंचित बहुजन आघाडीने सर्वांनाच केले आहे .
0 टिप्पण्या