Trending

6/recent/ticker-posts

धारावीत कोरोनाचा आणखीन एक रुग्ण

धारावीत कोरोनाचा आणखीन एक रुग्णमुंबई
मुंबई महापालिकेने धारावीतील बालिका नगर परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी आहे. धारावीत त्याला तैनात करण्यात आलं होतं.
 करोनाची लक्षणं आढळल्याने अधिकाऱ्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं होतं. यावेळी त्याला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे.  सध्या या सफाई कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments