Top Post Ad

शहापुरात शेलवली गावच्या हद्दीत गावठी दारू विक्री, एका महिलेसह सहा जणांवर गुन्हे दाखल

शहापुरात शेलवली गावच्या हद्दीत गावठी दारू विक्री, एका महिलेसह सहा जणांवर गुन्हे दाखलशहापूर .(संजय भालेराव)


: महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर गावठी हटभट्टीची दारू वेगवेगळ्या ठिकाणी विकणाऱ्या एका महिलेसह सहा इसमांवर शहापूर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या खबरी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहापूर तालुक्यातील मौजे शेलावली येथे  राहणारे सुनिल लक्ष्मण पवार, योगेश भाऊ पवार हे  दोघे तसेच रमेश कृष्णा पवार हा माणगाव, धसई येथील डुकरोली खदान येथे शेलवली गावच्या हद्दीत गावठी हटभट्टीची दारू विक्री करत आहे अशी अधिकृत बातमी निळाल्यानुसार पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, बळीप, सोबत पोलीस हवालदार काशिनाथ सोनवणे, जयराम शिंदे, पोलीस शिपाई बी. एन. बेंडकोळी, चालक पोलीस शिपाई विसपुते दोन पंचांना घेऊन गुरुवारी (दि.२) सायंकाळी ७.४५ वाजता छापा टाकला असता सुनिल लक्ष्मण पवार, योगेश भाऊ पवार यांचे कडे   एक लिटरचे असे एकूण सात प्लास्टिकचे फुगे  त्यात सात लिटर गावठी हातभाट्टी ची दारू असा सातशे  रुपये किंमतीचा माल मिळाला.


तर दुसऱ्या त्याच दिवशी गुरुवारी (दि.२) रात्री आठ वाजता छापा टाकला असता रमेश कृष्णा पवार याचे कडे एक लिटरचे असे एकूण पाच प्लास्टिकचे फुगे  त्यात पाच लिटर गावठी हातभाट्टी ची दारू असा पाचशे  रुपये किंमतीचा माल मिळाला असून याप्रकरणी दोन्ही छाप्यातील आरोपी सुनिल लक्ष्मण पवार, योगेश भाऊ पवार हे  दोघे तसेच रमेश कृष्णा पवार यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जयराम शिंदे करत आहेत. तसेच मौजे आटगाव येथे राहणारी रंजना प्रकाश पाटील ही व अनंता हरी घावट हे त्यांच्या राहत्या कौलारू घरात गावठी दारूचा धंदा करीत आहे अशी माहिती मिळाल्यानुसार पोलीस हवालदार कैलास पाटील, प्रकाश अवतार, पोलीस नाईक श्रीराम पाटील, कल्याणराव चीनवर, महिला पोलीस शिपाई पोटे, चालक पोलीस शिपाई खेडकर दोन पंचांना घेऊन रविवारी दुपारी ३.३० (दि.५) छापा टाकला असता महिला पोलीस शिपाई पोटे यांनी रंजना प्रकाश पाटील हिस जागीच पकडले प्लस्टिकच्या कॅमध्ये चार लिटर गावठी दारू असा चारशे रुपये किंमतीचा माल मिळाला असून रविवारी दुपारी ३.५० (दि.५) वाजता दुसऱ्या छापा टाकला असता अनंता हरी घावट याचेकडे प्लस्टिकच्या कॅमध्ये पाच लिटर गावठी दारू असा पाचशे रुपये किंमतीचा माल मिळाला.


तिसऱ्या छाप्यात सोमवारी (दि.६) दुपारी १.३० वाजता पोलीस उपनिरीक्षक बळीप, पोलीस नाईक नलावडे, जोशी, पोलीस शिपाई भाऊ बेंडकोळी यांना गंगारोड, गोठेघर शहापूर येथे विलास जानू तुपे त्याच्या घरासमोर ताडपत्रीच्या शेडमध्ये याचेकडे प्लस्टिकच्या कॅमध्ये व डब्यामध्ये चार लिटर गावठी दारू असा चारशे रुपये किंमतीचा माल मिळाला. असून याप्रकरणी तीनही छाप्यातील आरोपी रंजना प्रकाश पाटील, अनंता हरी घावट व विलास जानू तुपे यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव करीत आहेत.


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com