Top Post Ad

नोब्रोकर डॉटकॉमची ३० दशलक्ष डॉलरची निधी उभारणी

नोब्रोकर डॉटकॉमची ३० दशलक्ष डॉलरची निधी उभारणी


मुंबई


नोब्रोकर.कॉमने सिरीज डीमध्ये आज ३० दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी केली आहे. जनरल अटलांटिकने गुंतवणुकीच्या या फेरीचे नेतृत्व केले असून हा आकडा ८० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचला आहे. अशारितीने नोब्रोकरने आतापर्यंत १५१ दशलक्ष डॉलरचा निधी उभारला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये नोब्रोकरने सिरीज डी फेरीत टायगर ग्लोबलच्या नेतृत्वाखाली ५० दशलक्ष डॉलरची निधी उभारणी केली होती. या फेरीत जनरल अटलांटिकनेदेखील सहभाग नोंदवला होता. सध्याची निधी उभारणी हा त्याच फेरीचा पुढील भाग आहे.


नोब्रोकर.कॉम ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये व्यवहार अधिक सोयीस्कर आणि स्वस्त बनवून यूझर्सचा अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. नोब्रोकरवर आधीच ३५ लाख मालमत्तांची नोंदणी आहे. तर ८५ लाखांहून अधिक व्यक्तींनी नोब्रोकरची सेवा वापरली आहे. नोब्रोकर हे भाडे, विक्री, पुनर्निक्रीपासून व्यवहारानंतरच्या सेवा उदा. लोन, पॅकर्स व मूव्हर्स, लिगल डॉक्युमेंटेशन, ऑनलाइन रेंट पेमेंट, इंंटेरिअर्स इत्यादीसारख्या सर्व गोष्टींसाठी रिअल इस्टेटच्या प्रवासात वन स्टॉप शॉपची भूमिका बजावते.


           नोब्रोकर डॉटकॉमचे सीटीओ व सह संस्थापक अखिल गुप्ता यांनी सांगितले की, 'तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण रिअल इस्टेट व्यवहाराचा प्रवास सुलभ बनविण्यावर आमचा भर आहे. या मंचावर आम्ही मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत घेऊन मोठ्या प्रमाणावर डाटा निर्माण करतो. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला अनुरूप माहिती मिळते व सर्व व्यवहार वेगाने होतात. आमच्या तंत्रज्ञानातील संशोधनासाठी गुंतवणूकदारांनी दिलेला आधार खूप महत्त्वाचा वाटतो. आम्ही आमच्या वित्तीय सेवांमध्ये आणखी गुंतवणूक करू ज्याद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत आम्हाला आमची सेवा पोहोचविता येईल.   



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com