Top Post Ad

ठामपाच्या सर्व नगरसेवकांनी प्रत्येकी १० लाख नगरसेवकनिधी पालिकेस वर्ग करावा - जाग

ठामपाच्या सर्व नगरसेवकांनी प्रत्येकी १० लाख नगरसेवकनिधी पालिकेस वर्ग करावा - जाग


 ठाणे


अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांनी रुपये १० लाख नगरसेवकनिधी प्रती नगरसेवक महापालिकेस वर्ग करावा. त्यासाठी लागणारी स्थायी समितीची मंजुरी घेऊन तसा ठराव राज्यशासनाकडे त्वरित मंजुरीसाठी पाठवावा व कोरोना लॉकडाऊन मुळे बाधीत हातावर पोट असणारे गोरगरीब नागरिक  यांना नगरसेवक निधीतून अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा. तसेच गरज भासल्यास सोबत जोडलेले भांडवली खर्च यावर्षी कमी करावेत व त्यातील काही निधी वापरावा. आशा आहे आपण याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी पत्राद्वारे जाग – Joint Action & Awareness Group या संस्थेच्या वतीने संजय मंगला गोपाळ, जगदीश खैरालिया, वंदनाताई शिंदे, प्रदीप इंदुलकर, मिलिंद गायकवाड, अजय भोसले यांनी ठाणे महानगर पालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आङे. 


कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे संपूर्ण देशात गेले कित्येक दिवस  लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे गोरगरीब कामगार वर्ग कोणतीही कमाई नसल्याने हवालदिल झालेला आहे. बहुतेक गरिबांच्या कडे असलेले अन्नधान्य तसेच पैसे आता संपलेले आहेत. त्यांना दोन वेळचे जेवण मिळनेसुद्धा जिकरीचे बनले आहे. परिस्थिती अशीच राहिली भीषण परिस्थिती उद:भऊ शकते सबब दंगल सदृष्य लुटमार सुरु होऊ शकते अशी भीतीही पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. 



     


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com